भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सीजनची कमतरता भासली. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मानवाने निसर्गात केलेला हस्तक्षेप. पर्यावरणाची साखळी समतोल करायची असेल तर वृक्षारोपण करणे देखील गरजेचे आहे. यासाठी जनजागृती महत्वाची असुन येणाऱ्या काळात पर्यारणा साठी समतोल राखणे गरजेेचे आहे. यासाठी सर्वोदय हायस्कूल किन्ही येथील नुतन मुख्याध्यापक डी.पी.साळूंखे यांनी वृक्षारोपण करून मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला.
किन्ही. ता.भुसावळ येथील सर्वोदय हायस्कूल येथील मुख्याध्यापक एस.एन. पाटील व पर्यवेक्षक डॉ. पी.एस.कोळी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी मुख्याध्यापक पदी डी.पी. साळूूंखे व पर्यवेक्षक पदी डी.सी.बाविस्कर यांची नियुक्ती झाली. यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डी.पी. साळूंखे म्हणाले की, सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगीकरणामुळे जंगलाची संख्या कमी झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा परिणाम सर्व सजीवसृष्टीवर झाला असुन विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.त्याच प्रमाणे मानवा मधे पर्यावरणाविषयी देखील अनास्था निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांमधे पर्यावणा विषयी प्रेम व जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्यात विद्यार्थीदशे पासूनच पर्यावरण विषयक जाण निर्माण होईल. येणाऱ्या काळात यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार असुन याची सुरूवात माझ्यापासूनच करत असल्याचे सांगीतले
यावेळी भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी. सपकाळे, ईब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. आर. धनगर, शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.एस.अहिरे, इश्तु संघटनेचे जि्ल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे, माध्यमिक पतपेढीचे संचालक संजू भटकर, अनिल माळी, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनिल वानखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार एस.एम. पाटील यांनी केले.

*फोटो ओळ – वृक्षारोपण करताना डी.पी. साळूंखे, डी.सी बाविस्कर, जे.पी. सपकाळे, आर.आर.धनगर, एस.एस.अहिरे, प्रशांत नरवाडे, संजू भटकर, अनिल माळी आदि*


