मानव सेवा हिच खरी ईश्वरसेवा – राजश्री नेवे ; सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम ; अंधबांधवाना ब्लैंकेट वाटप ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पुण्य मिळविण्याकरीता केवळ दान धर्म न करता या जगात जन्मास आलेल्या प्रत्येक सुदृढ देह प्राप्त मानवाने एक़दा तरी पुढाकार घेवून गोर गरीब व गरजु व्यक्तीसह दिव्यांग बांधवांना जीवनात मदत केली पाहिजे कारण मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा असल्याचे परखड मत सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे यांनी व्यक्त केले .
येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने
मंगळवार 2 फेब्रुवारी रोजी यावल तालुक्यातील अंजाळे येथील खान्देश अंधकल्याण संघ संचालित स्नेहदिप निराधर अंध महिला आश्रम येथील अंधबांधवाना व महिलांना ब्लैंकेट व साडी वाटप करण्यात आले . यावेळी राजश्री नेवे यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ राजश्री नेवे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला पतंजली राज्य कार्यकारणी सदस्या सौ . महानंदा पाटील , महिला मुक्ति मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ संगीता भामरे , पत्रकार उज्वला बागुल , कु. रुई जावळे, सौ .मंदाकिनी केदारे, आदी उपस्थित होते . अंधबांधव संजय पाटिल यांच्या गीताने कार्यक्रमास सुरवात झाली .प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या स्तुत्य कार्याचे कौतुक करून संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले .
यावेळी थंडी पासून बचाव व्हावा म्हणून उबदार ब्लैंकेट उपस्थित मान्यवरांचे व संस्थेच्या पदाधिकारी यांचे हस्ते अंध बांधवाना व महिलांना देण्यात आले ,तसेच महिलांना साडयाही वाटप करण्यात आल्या .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंधबांधव संजय पाटिल यांनी केले .
कार्यक्रमास रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी देशमुख यांचेसह सौ मायाताई चौधरीं , सौ भाग्यश्री नेवे , सौ स्मिता माहुरकर ,अंकिता राणे,संगीता लुल्ला , यांचेसह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *