सावदा –
परिसरातील
नांलंदा लांडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड, समाजसेवीका सौ.पुजा पंडित,अंजली चिंचोलकर, अजित शेकडे ,रविंद्र साळवे (हेडकाँस्टेबल),भरत कल्याणकर, समाजसेवक सुमित पंडित,सुर्यकांत मोटे पाटील यांना नुकताच पुरस्कार जाहिर झाला आहे .

लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था यांच्या २२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सामाजिक संस्था व सामाजिक कार्य करणाऱ्या विविध १०१ मान्यवरांना राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्यापैकी औरंगाबाद येथील गोरगरीब गरजवंत रुग्णांना मदतकार्य करनाऱ्या व विविध सामाजिक उपक्रम रबविनाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व नांलंदा लांडगे,साय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड, समाजसेवीका सौ.पुजा पंडित,अंजली चिंचोलकर, अजित शेकडे,रविंद्र साळवे (हेडकाँस्टेबल),भरतभाऊ कल्याणकर,समाजसेवक सुमित पंडित,सुर्यकांत मोटे पाटील यांच्या सह १०१ मन्यवरांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे पुरस्कार जाहीर झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष अर्चना मेडेवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे हा पुरस्कार सोहळा दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबाद येथे मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे साजरा होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य मंत्री राजेश टोपे व माजी मंत्री अतुल सावे, डॉक्टर प्रमोद वाचस्पति राष्ट्रीय अध्यक्ष आदि उपस्थित राहणार आहे. ह्या पुरस्काराने माणुसकी समुहाच्या सभासदांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वस स्तरातून कौतुक होत आहे.


