वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळते – डॉ. राजेंद्र महाजन ऑनलाइन झूम ॲपद्वारे संपन्न झाली स्पर्धा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या सर्वत्र शाळा बंद आहेत विद्यार्थी घरी आहेत घरी असून देखील काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत परंतु घरी असल्यामुळे अनेकांना कंटाळा आलेला आहे अनेक विद्यार्थी स्वतःच्या विरंगुळ्यासाठी विविध साधनांचा वापर करीत आहे परंतु विद्यार्थ्यांच्या पॉझिटिव्ह ऊर्जेला योग्य पद्धतीने वापरायचे असेल तर त्यांना विविध उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवले पाहिजे वकृत्व स्पर्धा सुद्धा हा त्यातील एक चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांना स्वतःमधील विचार मांडण्याची संधी या माध्यमातून मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी केले
माध्यमिक शिक्षणाधिकारी बी जे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की कोरोनाविषाणू च्या विरुद्ध लढण्यासाठी स्वतः सक्षम व आपल्या कुटुंबाला सांभाळा शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा व या साखळीला तोडूया या लढाईत विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्ष उतरायचे आहे स्वतः जसे नियमांचे पालन करत आहे तसे इतरांना देखील नियम पाळण्यास सांगा व महामारी वरती विजय मिळवू या

इयत्ता सहावी ते आठवी व नववी ते बारावी या दोन गटांसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, डॉ. सी व्ही रमण व व डॉ. एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राजेंद्र महाजन म्हणाले की विद्यार्थ्यांनी कधीही कल्पना केली नसेल असे अनुभव त्यांना याकाळात अनुभवयास मिळत आहे मोबाईलच्या माध्यमातून झूम ॲप द्वारे एकमेकांशी बोलण्याची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे त्यांच्या ऊर्जेला एक वेगळे रूप देण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे वकृत्व स्पर्धा ही खरोखरच विचारांना भावनांना आणि आपल्या अंगी असलेल्या गुणांना वाव देणारी संधी आहे

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बी बी जोगी म्हणाले की धावत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या संस्कृतीमधील चांगल्या गोष्टींचा विसर आपल्याला पडत आलेला आहे या गोष्टींचा अनुभव विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे
परंपरा जपूया कोरोनाला हरवू या, कोरोना इष्टापत्ती का दृष्टापत्ती, आजीचा बटवा कोरोनाला चकवा या तीन विषयावरती विद्यार्थ्यांनी 22 मार्चपासून अनुभवलेल्या विविध गोष्टींचे अनुकरण अनुभव या ठिकाणी आपल्या वकृत्व स्पर्धेतून सांगितले तसेच निसर्गा पेक्षा मोठं कोणीही नाही तसेच आपल्या रूढी परंपरा नुसार चालत आलेल्या गोष्टी कशा चांगल्या हे पटवून सांगितले

या स्पर्धेचे परीक्षण पाचोरा येथील एम एम कॉलेज चे प्रा.डॉ अतुल सूर्यवंशी भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी संत गाडगेबाबा हिंदी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रमोद आठवले राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे गव्हर्निंग बॉडी मेंबर किशोर राजे यांनी केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुका समन्वयक व सदस्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *