नाभिक समाज मोठया आर्थिक अडचणीत ; सलूनच्या व्यवसायाला परवानगी द्यायला हवी – मंगेश पाटील


भुसावळ (प्रतिनिधी )-
नाभिक समाज मोठया आर्थिक अडचणीत आला असून सलूनच्या व्यवसायाला शासनाने परवानगी द्यायला हवी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी केलेली आहे.
सलग ४ लॉकडाऊन नंतर आपण आता अनलॉकिंग करण्याकडे सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने विविध तज्ज्ञांशी चर्चा करून काही व्यवसायांना सुरू करण्याची मुभा दिली आहे. या मध्ये सलून व्यवसायाचा देखील समावेश आहे.
गाव पातळीपासून विचार केल्यास किमान २० लाख लोकांना यामुळे रोजगार मिळतो.
नाभिक समाज जो मुख्यतः या व्यवसायात आहे त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सलून व्यवसायाला आता राज्य शासनाने सूट दिली पाहिजे.
सोशल डिस्टनसिंग बाबत काही नियम देखील घालून दिले गेले तरी हरकत नाही पण आता नाभिक समाजाची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. देशातील काही राज्यांनी देखील सलून व्यवसायाला सूट दिलेली आहे.
बाकी राज्यात ज्याप्रमाणे सूट दिलेली आहे त्याप्रमाणे आपणही अटी नियमानुसार सलून व्यवसायिकांना परवानगी द्यायला हवी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *