पूुणे आणि जबलपुर दरम्यान दोन विशेष गाड्या

भुसावळ दी 1 (प्रतीनिधी ) :- प्रवाश्यांची वाढती संख्या लक्षात घेवून मध्य रेल्वेने पुणे आणि जबलपुर दरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी दोन विशेष रेल्वे गाड़या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे
गाडी क्रमांक ०१६५५ ही विशेष गाडी पुणे येथून दर मंगळवारी १०:४५ निघून दुस-या दिवशी ६.५५ वाजता जबलपुर येथे पोहचनार आहे . ही गाडी २९जानेवारी २०१९ पर्यंत सुरु राहणार आहे .

तर गाडी क्रमांक ०१६५६ विशेष जबलपुर हुन प्रत्येक रविवारला १९.३० वाजता निघणार आहे .ही गाडी दुस-या दिवशी १४.०५ वाजता पुणे येथे पोहचेल .ही गाडी २७ जानेवारी २०१९ पर्यन्त सुरु राहिल .

दरम्यान या गाडीला दौंड , अहमदनगर ,
कोपरगांव , मनमाड , भुसावळ , खंडवा , हरदा , इटारसी , पिपरिया , नरसिंहपुर, आणि मदन महल येथे थांबा आहे . गाडीला एक वातानुकुलित , सेकंड क्लास चार ,
वातानुकूलीन थ्री टियर, १० स्लिपर क्लास , व एक जनरल याप्रमाणे डब्यांची संख्या असेल . तर या गाडीचे रिझर्वेशन करीता विशेष भाडे तत्वावर सर्व पीआरएस, इंटरनेट , तसेच वेबसाईट , www. irctc. co. in यावर दिनांक ३ जानेवारी २०१९ पासून आरक्षण सुरु होणार आहे . तर जनरल सेकंड क्लास च्या डबे हे अनारक्षित असतील त्यासाठी याची बुकिंग यूटीएस च्या माध्यमातून करण्यात येणार आहे .
प्रवाश्यानी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे सुत्रानी केले आहे