पुणे –
राज्यात गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे. येत्या 36 तासांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये येत्या शुक्रवारी, शनिवारी जोरदार पाऊस बरसेल त्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert ) देण्यात आला आहे. तसेच रायगड सह तळ कोकणापर्यंतच्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात १३ सप्टेंबरपासून पुढील चार पाच दिवस जोरदार पावसाचा तडाखा बसू शकतो.



