आनंदी जीवनासाठी नकारात्मकतेत देखील सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे -संदीपकुमार बोरसे ;आई सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मार्च महिन्यापासून कोरोनाविषाणू ने विळखा घातलेला आहे यामुळे आपण जवळपास चार महिने लॉकडाऊन होतो परंतु आता हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे हे करत असतांना नियमांचे तंतोतंत पालन करत आनंदी जीवनासाठी या नकारात्मकतेत देखील सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असे प्रतिपादन वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी केले
पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयुध निर्माणीतील आई सावित्रीबाई फुले बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षकांचा गौरव समारंभ महात्मा गांधी विद्यालयात सोशल डिस्टंसिंग चे पालन करून करण्यात आला यावेळी बोलताना कोरोना महामारी असली तरी या नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील सकारात्मक विचार आपण केला पाहिजे आपण घरी असताना अनेक गोष्टी शिकलो स्वच्छतेचे महत्व, सोशल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे फायदे, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन व्यवहार यासह कितीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या तसेच आपले अनेक आजार देखील याकाळात आपल्यापासून दूर पळाले मात्र शाळा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षकांवर ती मोठी जबाबदारी असणार आहे नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याची जनजागृती करावी लागणार आहे विद्यार्थ्यांच्या बालमनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम शिक्षक करीत असतात आणि शिक्षक दिनाला त्यांचा सत्कार होणे गरजेचे आहे
या कार्यक्रमाला दि वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र चौधरी आई सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शीलांबरी जमदाडे मुख्याध्यापक आर ए वाघ मुख्याध्यापिका वंदना चव्हाण पर्यवेक्षिका संगीता चौधरी रूपा कुलकर्णी जयंत जोशी तेजस जमदाडे आदी उपस्थित होते.
कोरोना च्या काळामध्ये पूर्णवेळ आपली सेवा बजावीत कायदा व सुव्यवस्था राखणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे व आई हॉस्पिटल चे स्त्री रोग तज्ञ डॉ. विनोद चौधरी यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी पिंपळगाव खुर्द येथील हरी किटकुल बढे विद्यालयातील वंदना पाटील, महात्मा गांधी विद्यालयातील मुख्याध्यापक आर ए वाघ, उपप्राचार्य डी के महाजन, उपमुख्याध्यापिका वंदना चव्हाण, शिक्षक सी जे तायडे, क्रीडाशिक्षक आशिष चौधरी, कलाशिक्षक राजेंद्र सोनवणे, गोपाळ बानाईत, मोहन नवगाळे, सीमा ठाकुर, संतोष शेळके, सुनील वानखेडे, नलिनी बाविस्कर (के नारखेडे विद्यालय, भुसावळ ), ऑडनस फॅक्टरी वरणगाव हायस्कूलचे सागर सोनार व रितेश तायडे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना शीलांबरी जमदाडे म्हणाले की समाजामध्ये चांगल्या गोष्टींना समोर आणणे व त्यांचा आदर्श घेऊन पुढे चालण्यासाठी वेळोवेळी संस्थेच्या वतीने काम केले जात असते प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचा मोठा हातभार असतो आणि त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळून अधिक काम होत असते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश पाटील यांनी तर आभार संदीप महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *