हिल गँगचे मध्य रेल्वेचे घाटांतील योद्धे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या भोर घाट (कर्जत आणि खंडाळा दरम्यान) आणि थूल घाटातील (कसारा आणि इगतपुरी दरम्यान) सर्वात आव्हानात्मक कार्यभार करणारी हिल गँग त्यांच्या रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन रॅपलिंगद्वारे रेल्वे संरक्षेतील अत्यंत आव्हानात्मक कार्य करीत आहे. हे संरक्षा सैनिक वर्षभर पुणे आणि भारताच्या दक्षिण भागांकडे तसेच नाशिक व भारताच्या उत्तर भागांकडे जाणा-या गाड्यांना सुरळीत व सुरक्षित रेल्वे मार्ग सुनिश्चित होण्यासाठी वर्षभर काम करतात. हे हिल गँगचे सदस्य डोंगरावर रॅपेलिंगच्या तज्ञांच्या माध्यमातून, रुळांवर पडण्याची शक्यता असलेल्या सैल व धोकादायक दगड काढून टाकतात, भूस्खलन होण्याची शक्यता असलेली चिखल साफ करतात, पाण्याचा निचरा होण्यासाठी चिखल साफ करणे इत्यादी कामे करून पावसाळ्यात होणा-या कोणत्याही असामान्य घटना टाळतात.
हिल गॅगचे सदस्य रुळांवरील उंच आणि उभ्या डोंगरांवर चढतात आणि रॅपेलिंगद्वारे सैल आणि असुरक्षित दगड शोधून काढतात आणि दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत लाल रंगाने ते चिन्हांकित करतात. त्यानंतर, एप्रिल आणि मे महिन्यात ते दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेवून चिन्हांकित सैल आणि असुरक्षित दरड पाडतात. या कमजोर दरडींना विशेषतः काढले जातात. यावर्षी केवळ भोर घाट आणि थूल घाटात ६५० हून अधिक सैल दगड शोधले गेले आणि ते दरड ३ वॅगनच्या विशेष गाडीने दररोज ५ तास ब्लॉक घेत ६० दिवसांत साफ केले.
भोर घाट आणि थूल घाटात प्रत्येकी दहा हिल गॅगनी हे महत्वाकांक्षी आणि धाडसी कार्य पूर्ण केले आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली सुरक्षा गीअर्स आणि उपकरणे म्हणजे सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट (हार्नेस), दुर्बिणी, १०० मीटर दोरी, हँड ग्लोव्हज, सेफ्टी जॅकेट, कटवनी, पहार, फोंक, रेड पेंट, ब्रश, प्रथमोपचार बॉक्स, ५ किलो घन, वेगवेगळ्या आकाराचे हातोडे, शिटी, छिन्नी, वेगवेगळ्या आकाराच्या कु-हाडी , वायरचा पंजा, हँड सिग्नलचा लाल / हिरवा झेंडा, फावडे, जाम बावटा व घमेला या वस्तू समाविष्ट आहेत. पावसाळ्यात आणि त्यानंतर हिल गॅगचे सदस्य विखुरलेल्या मोकळ्या दगडांचे स्कॅनिंग आणि आवश्यकतेनुसार तोडण्याचे काम करतात, चॉक-अप कॅच वॉटर ड्रेन व पूल साफ करतात, वृक्षतोड आणि पुलाची साफसफाई करतात.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची मुख्य टेकडी ही सह्याद्री रेंज आहे, या रेंजमध्ये अनेक पास किंवा ‘घाट’ आहेत, त्यापैकी भोर घाट आणि थल घाट उल्लेखनीय आहेत. या घाटांवरुनच मुंबईहून जाणारी रेल्वेगाडी अनुक्रमे पुणे आणि नाशिकला पोहचते. या घाटांमधील रोडवे आणि रेल्वेसाठीचा प्रवास दोन्ही मोठे आव्हान आहे. या घाटांमधून जाणारे उभे ग्रेडियंट रेल्वे मार्ग, मध्य रेल्वेला एक अनन्य आव्हान आहे. शिवाय, मुसळधार पावसाच्या वेळी जोरदार उतारामुळे जड दगड खाली जायला लागतात आणि छोट्या छोट्या दरडी सुटतात. मोठमोठे दरडी हिल गॅगनी छिन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने तुकडे केलेले आणि साफ केलेले आहेत, तर गाड्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी छोट्या दरडी तोडल्या आहेत.
बर्‍याच रॉक गिर्यारोहकांसाठी माउंटन रॅपलिंग हे एक साहसी कार्य आहे, परंतु मध्य रेल्वेच्या या टेकड्यांच्या टोळ्यांद्वारे (हिल गॅग) रेल्वेची संरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे कार्य केले जात आहे. रेल्वेतील हे कामगार सैनिक कठीण हवामानातील परिस्थितीत घाम गाळतात म्हणून या घाटांतून जाणा-या गाड्या कोणत्याही अनुचित घटनेपासून वाचतात. मध्य रेल्वेच्या डोंगराळ गँगसाठी दरवर्षीच हे आव्हान असते. हिल गैंगच्या कौतुकास्पद कार्यामुळे ते मध्य रेल्वेचे घाटांतील योद्धे ठरले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *