जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्व गलथान कारभाराची चौकशी करा- शिशिर जावळे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरें व आरोग्य मंत्र्यांकडे केली तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय (सिविल हॉस्पिटल )हे असुविधा असलेले गलथान व भोंगळ कारभार म्हणून प्रसिद्ध आहे. सातत्याने सिविल हॉस्पिटल मध्ये रुग्णांची पिळवणूक केली जाते, अपंग प्रमाणपत्र, पोस्टमार्टम चा विषय असो, दलालांचा सुळसुळाट, लाच घेण्याचे प्रकार, तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराचा विषय असोत. आर्थिक देवाण-घेवाण गैरव्यवहाराचा विषय असोत, रुग्णांची आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची प्रचंड पिळवणूकिचा विषय, या ना त्या विविध समस्या तक्रारींच्या बाबतीत.. जळगाव शासकीय रुग्णालय हे सातत्याने गंभीर चर्चेत आलेला आहे. आणि अशातच सध्या जळगाव जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची वाढती परिस्थिती आणि मृत्यूचा दर हा अतिशय चिंतनीय आहे आणि निंदनीय आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व जळगाव जिल्ह्याच्या सिविल हॉस्पिटल मधून भुसावळ येथील तिथे ऍडमिट असलेली एक वृद्ध रुग्ण महिला अचानक बेपत्ता झाली. प्रशासनाने भरपूर चौकशी केली पण मात्र ती बेपत्ता महिला त्यांना सापडली नाही. सदर रुग्णालयातल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे ती महिला कुठे बेपत्ता झाली याचा शोध थांगपत्ता संबंधित प्रशासकीय यंत्रणेला लागत नव्हता. आणि अचानक चार दिवसांनी ती वृद्ध महिला जळगाव सिविल हॉस्पिटल मधील शौचालयात मृतावस्थेत सापडली. चार दिवस बेपत्ता असलेली महिला शौचालयांमध्ये मृत सापडते म्हणजेच त्याचा उच्चार यात आजपर्यंत एकही स्वच्छता कर्मचारी गेला नसेल काय?? यावर प्रश्नचिन्ह उठत आहे.. आणि म्हणून या गलथान कारभाराला जनता, रुग्ण कंटाळली आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे मृत्यूच यमद्वार च आहे अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. कधी अहवाल पॉझिटिव येतो तर कधी निगेटिव्ह येतो, कधी रुग्णांकडे लक्ष दिलं जात नाही., आणि म्हणून अशा या दुर्लक्षित व नियंत्रण नसलेल्या
जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मधील भुसावळ येथील वृद्ध महिलेच्या मृत्यूचि, सखोल चौकशी व्हावी व त्यांच्या मृत्यूस जबाबदार सर्वांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करनण्याची तसेच या रुग्णालयासाठी च्या शासकीय योजना,विविध अनुदान , ठेके,रुग्ण व जनतेच्या विविध तक्रारी , कोविड साठी चे विविध अनुदान, कोविड रुग्ण व त्यांचे नाते वाइकांचे प्राप्त सर्व मेडिकल रिपोर्टस, गलथान कारभार यांची उच्च स्तरिय चौकशी करण्याची मागणी प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार व प्रसार समितीचे जळगाव जिल्हाअध्यक्ष शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *