भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील साकेगाव येथे गेल्या वीस दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने वीज बिल भरूनही वीजपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

या वीज खंडितीचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असून साकेगावसह गोदावरी नगर, स्वामी विहार, भाग्यश्री विहार, मोरेश्वर नगर, सीताराम नगर, महालक्ष्मी नगर आणि इतर परिसरातील सुमारे 1 लाख लोकसंख्या पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. काही भागांमध्ये संपूर्ण वीजपुरवठा बंद असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
याबाबत माजी नगरसेवक दीपक धांडे (शिवसेना शिंदे गट) यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, गटविकास अधिकारी व वीज मंडळाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, समस्या त्वरित न सुटल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
फोटो ओळ ……साकेगाव ग्रामसेवक श्री सातव यांना तत्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत निवेदन देताना दिपक धांडे….


