विल्हाळा शिवारातील घटना : लाखोंचे नुकसान

भुसावळ (प्रतिनिधी)
तालुक्यातील बिल्हाळा शेती शिवारातील सहा एकर क्षेत्रातील गव्हाच्या पेंढ्यांचा ढीग वीज कोसळल्याने दि. १८ मार्च रात्री जळून खाक झाल
, दि. १८ मार्च रोजी रात्री पावणे सात ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान वादळी अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटात कोसळला. त्यावेळी वीज कोसळून विल्हाळा शेती शिवारातील दीपक सोपान वारके व नयना दीपक वारके यांच्या गट नंबर ७४६ मध्ये सहा एकर क्षेत्रात गव्हाच्या पेंड्या गहू काढण्यासाठी गोळा करून एकत्र ढीग करून ठेवलेल्या होत्या. मात्र अवकाळी पाऊस पडत असताना बीज कोसळून झालेल्या घटनेत संपूर्ण क्षेत्रातील गव्हाच्या पेंढ्या जळून खाक झाल्या, त्यामुळे दीपक वारके व सौ. नयना वारके यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचा गह जळून खाक झाला. परिणामी अगदी हाता तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील घास डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदरच खरीप हंगाम पूर्णतः हाती आलेला नाही त्यातही रब्बीचे असे नुकसान झाल्याने संबंधित कुटुंब हतबल झाल्याचे दिसून आले. महसूल व कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत देऊन कुटुंबाला दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
शिंदीसह परिसरात पावसाचे थैमान पिकांचे नुकसान
शिंदी, ता. मुसावळ शिंदीसह मोंढाळा, मानमोडी, विचवा परिसरात सायंकाळी पावणे सात ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान सुमारे सव्वा तास जोरदार विजांच्या गडगडात पाऊस झाला. शेती शिवारातून पाणी वाहून निघाले. परिणामी शेतकऱ्यांची मोठी चांदल उडाली. कापणीला आलेला गहू, हरभरा, मका या पिकाचे व गुरांसाठी साठवून ठेवलेल्या कडबा पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे येथील युवा शेतकरी भूषण पुनमसिंग राजपूत यांनी सांगितले. पाऊस सुरू असतानाच वीज गेल्यामुळे गावातही अचानक
आलेले या पावसामुळे ग्रामस्थांची धावपळ झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाने तातडीने शेती शिवारात पंचनामे करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या निलिमा नेमाडे यांनी सांगितले. रात्रीची वेळ झाल्याने गावासह शेती शिवारातील नुकसानीचा अंदाज येऊ शकला नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर शेती शिवारात हानी झाल्याचे सांगण्यात आले.


