भुसावळात स्वा.विनायक सावरकर पुण्यतिथी साजरी:

भुसावळ (प्रतिनिधी) : स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळ येथे धार्मिक व राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था, परिभ्रमण त्रिपदी मंडळ, सकल हिंदू समिती व ब्राह्मण संघ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात त्रिपदी मंडळाच्या सुश्राव्य श्री दत्त भजनांनी झाली. संस्थेचे सचिव गणेश वढवेकर यांनी जामनेर रोडवरील सावरकर चौक येथे सावरकरांच्या प्रतिमा व फलकाला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्रिपदी मंडळाच्या वतीने भजन व नामस्मरण करण्यात आले.

यावेळी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे तसेच ‘सागरा प्राण तळमळला’ या गीताला ११५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दोन्ही गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

संस्था सचिव गणेश वढवेकर यांनी मनोगतात भुसावळ शहरातील सावरकर कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महेशभाऊ फालक, उपाध्यक्ष माधवी संत, कोषाध्यक्ष महेंद्र गोडबोले, नगरसेवक निर्मल कोठारी, त्रिपदी मंडळाच्या सरिता देशपांडे, रविंद्र जोशी यांच्यासह अनेक दत्तभक्त व सावरकरप्रेमी उपस्थित होते.

याशिवाय प्रकाश दलाल, रामभाऊ गचके, सुरेशराव कुलकर्णी, दीपक अडावदकर, जयंत राजहंस, मिलिंद धर्माधिकारी, गजानन जोशी, मंगला जोशी, कल्पना दामले, मृणाल गाडगीळ, लक्ष्मी वढवेकर, संजय बोचरे, राजेश कोष्टी, शंतनू गचके, यश इंगळे, अशोक पाटील, दिलीप सुरवाडे, विवेक महाजनी, राम माहूरकर, गोपाळ जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आरव हॉटेल चे मुख्य संचालक अजय मिसार यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. नगरसेवक निर्मलभाऊ कोठारी यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले.

यावेळी सावरकरांचे पुण्यस्मरण तन, मन, धनाने करून त्यांच्या धर्म व राष्ट्रकार्याचा दीप तेवत ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.