भुसावळ विभागातील रेल्वे आरक्षण कार्यालये सुरू

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन सुरू असल्याने रेल्‍वे प्रशासनाने देशभरातील रेल्वेचे सर्व आरक्षण कार्यालये बंद केले होते.मात्र रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार २२ मे शुक्रवार पासून भुसावळ विभागातील आरक्षण कार्यालये आपल्या वेळेनुसार सुरू करण्यात आले आहेत. आरक्षण तिकीट रद्द करण्याची प्रक्रियाही दि.२५ मे पासून सुरू होणार आहे.आरक्षण तिकीट धारकांनी आपले आरक्षित रेल्‍वे तिकीट रद्द करण्याची घाई करू नये, गर्दीमुळे आरोग्याला धोका पोहोचण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांच्या गाड्या रद्द झाल्या आहेत, अशा प्रवाशांच्या आरक्षण तिकिटाचा परतावा हा सहा महिन्याच्या मुदतीपर्यंत दिला जाईल त्यामुळे त्यांनी स्टेशनवर गर्दी करू नये, असे आवाहन देखील भुसावळ विभागीय रेल्‍वे वाणिज्‍य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *