भुसावळ (प्रतिनिधी) – सेंट अलायन्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना अन्य प्रार्थनास्थळांना नेऊन त्यांच्या भावनांवर आघात केल्याचा आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अधिक कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनीसह अन्य संबंधीतानी आम्हाला हलक्यात घेऊ नये , न्याय प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे, कायद्याचा आदर करतो परंतू जो पर्यंत योग्य न्याय मिळणार नाही तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे प्रसंगी उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला .:

सेंट अलॉशियस शाळेत लहान विद्यार्थ्यांवर कथितरित्या धर्मांध धार्मिक उपक्रम राबवल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आज सोमवार, ८ डिसेंबर पत्रकार परिषद घेण्यात आली. ११ सप्टेंबर रोजी शाळेत घडलेल्या या 'विकृत' आणि 'बेकायदेशीर धार्मिक' कृतीने शिक्षण क्षेत्रातील पवित्रता आणि नैतिक मूल्यांवर थेट आघात केल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलमे अत्यंत सौम्य असून या गुन्ह्यांमध्ये पोक्सो कायद्यासह इतर कडक कलमे लागू करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या मानसिक परिणामांची गंभीर दखल घेऊनच दोषींना शिक्षा होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.शिक्षण विभागाने सेंट्रल आयसिस शाळेचे व्यवस्थापक असलेल्या द सोसायटी ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा या संस्थेच्या अध्यक्षांना मुख्याध्यापिकेसह पाच जणांच्या निलंबनाची नोटिस बजावली होती त्यानंतर शनिवारी रात्री गटशिक्षण अधिकाऱ्यांना फिर्यादीवरून धार्मिक भावना दुखावणे या कलमाने गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात धार्मिक जबरदस्ती,मानसिक शोषण अनुसूचित साहित्य प्रचार धार्मिक वैरभाव विद्यार्थी सुरक्षेला धोका पोस्को कटकारस्थान करणे अशी कलमे वाढवावी अशीही मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे
या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा करत, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नवीन कायदा करण्याचीही मागणी संघटनांनी मांडली. पोलिसांनी केलेली कारवाई ही “तोकडी व नावापुरती” असून कडक भादवी कलमे न लावल्याने आरोपी सुटण्याची शक्यता वाढल्याचा आरोपही संघटनांकडून करण्यात आला.
तसेच, पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणीही यावेळी व्यक्त करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना या प्रकरणी कोणतीही अडचण किंवा समस्या असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही संघटनांकडून करण्यात आले.
पत्रकार परिषदेत सकल हिंदू समाज प्रतिनिधी मुन्ना ठाकूर, ॲड.योगेश बाविस्कर, संचेेत सुराणा, रितेश जैन, शिशिर जावळे, भारती वैष्णव, राधेश्याम लाहोटी, डॉ. सूर्यभान पाटील, चंद्रशेखर पाटील, राहुल राणे, शाम दरगड, कैलासिंह चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


