भुसावळ (प्रतिनिधी) – “प्रभागाचा ज्या निष्ठेने विकास केला, त्याहून अधिक काम पुढील काळात व्हावे यासाठी आता रोहनला सेवेची संधी द्या”, असे आवाहन माजी नगरसेवक राजू भागवत सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले.

शनिवारी संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका पूजा सूर्यवंशी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग १३ अ चे उमेदवार रोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
प्रभागात केलेल्या विकासकामांची माहिती
यावेळी राजू सूर्यवंशी यांनी मागील कार्यकाळात करण्यात आलेल्या विकासकामांचा तसेच मंजूर झालेल्या विविध कामांचा आढावा घेतला. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत भुसावळ नगरपरिषदेने आठ विकासकामांच्या खर्च अंदाजासह मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व कामांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जळगाव येथील कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली असून शासन राजपत्रही प्रसिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मंजूर झालेली प्रमुख कामे , यात प्रल्हाद नगर येथील पुलापासून एजीसी स्कूलपर्यंत रस्ता तयार करणे , नगीन पार्क परिसरात नाल्याला संरक्षण भिंत , प्रल्हाद नगरातील जीर्ण पुल तोडून नवीन पुल उभारणे , रामायण नगर–एजीसी स्कूलपर्यंत आरसीसी नालीरामायण नगर, सुंदर नगर, गुजर कॉलनी, संभाजी नगर येथे ओपन जिम, सामाजिक सभागृह व सुशोभीकरणओपन स्पेसचे सुशोभीकरण व खेळ साहित्य उपलब्ध करून देणे
“प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय” – राजू सूर्यवंशी
“स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, अंडरग्राउंड गटारी, कचराकुंडी अशी मूलभूत कामे सातत्याने करत आलो आहोत. आता हीच विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी रोहन सूर्यवंशी यांना भरघोस मतदान करून विजयी करा”, असे आवाहन राजू भाऊ सूर्यवंशी यांनी केले.
“प्रभागाचे रूपडे बदलेल” – रोहन सूर्यवंशी
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहन सूर्यवंशी म्हणाले, “माझ्या आई–वडिलांनी प्रभागात उल्लेखनीय कामे केली आहेत. त्यांचे मार्गदर्शन व नागरिकांचे आशीर्वादरुपी संधी मिळाल्यास प्रभागाचा कायापालट करून येथे मुंबईच्या सिटीसारखी सुशोभितता आणण्याचा निर्धार आहे.” प्रभाग १३ अ च्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देत रोहन सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली.


