भुसावळ (प्रतिनिधी )-
पालघर जिल्ह्यात दोन साधुंसह तीघांच्या झालेल्या हत्येप्रकरणी चॅनलवर सुरु असलेल्या चर्चेत अर्णव गोस्वामी याने काँग्रेस पक्ष व पक्षाच्या अध्यक्षा खा.सोनिया गांधी यांच्या बद्दल गलीच्छ भाषेत बोलुन जाती-जातीत तेढ निर्माण होईल असे शब्द वापरले असून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भुसावळ शहर काँग्रेसने केली असून याबाबत तहसीलदार दिपक दिवरे यांना शुक्रवार २४ रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि,काँग्रेस पक्ष नेहमी सर्वधर्मिय एकतेवर चालणारा पक्ष आहे.हिंदु,मुस्लीम व ख्रिश्चन या धर्मात जातिय भांडण लावण्याचे काम गोस्वामी करीत आहे.साधु संत महाराष्ट्राची परंपरा असून आम्ही त्यांचा नेहमी सन्मान करतो.साधूंना मारण्याचा हा पुर्वनियोजित कट दिसत असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,महसूल मंत्री,गृहमंत्री व पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.यावेळी भुसावळ शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम,प्रदेश सचिव अनिता खरारे,प्रदेश समन्वयक भगवान मेढे,भुसावळ शहर सरचिटणीस शैलेंद्र व्ही.अहिरे उपस्थित होते.



