भुसावळ पालिकेची नविन प्रभाग रचना जाहीर – ३१ ऑगस्ट पर्यंत हरकती नोंदवण्याची संधी –


भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नवीन प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, आता शहरात २५ प्रभाग असतील,जी संख्या यापूर्वी २४ होती. नागरिकांना या रचनेवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकत नोंदवता येणार आहे. मात्र, आतापर्यंत एकही हरकत आलेली नाही.या आधी हरकतींसाठी २१ ऑगस्टपर्यंतची मुदत होती, ती आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पुढील प्रक्रिया अशी असणार आहे:
१ ते ८ सप्टेंबर : जिल्हाधिकारी हरकतींवर सुनावणी घेतील .९ ते ११ सप्टेंबर : हरकती नगरविकास विभागाकडे पाठवणार .१२ ते १८ सप्टेंबर : अंतिम प्रभाग रचना तयार होईल .
२६ ते ३० सप्टेंबर : राज्य निवडणूक आयोग अंतिम रचना अधिसूचित करेल .
एक प्रभाग व दोन नगरसेवकांची वाढ –
२०१६ मध्ये शहरात २४ प्रभाग होते आणि एकूण ४८ नगरसेवक होते.आता लोकसंख्येनुसार एक प्रभाग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे एकूण २५ प्रभाग आणि ५० नगरसेवक असतील. हे निश्चीत आहे .
ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू –
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी समाजाला २७% आरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे २०२२ मधील प्रभाग रचना रद्द करून नवीन प्रारूप तयार करण्यात आले आहे. आरक्षणानुसार: -ओबीसीसाठी – १३ प्रभाग,
अनुसूचित जातीसाठी – ८ प्रभाग ,अनुसूचित जमातीसाठी – २ प्रभाग .
राजकीय हालचालींना वेग –
निवडणूक जशी जवळ येते आहे, तशी राजकीय हालचालही वाढली आहे. काही माजी नगरसेवक व नवोदित उमेदवारांनी नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. नव्या प्रभाग रचनेनंतर प्रत्येक भागातील जातीय आणि सामाजिक गणितांचा अभ्यास सुरू झाला आहे. मतदार संख्या व सामाजिक स्थिती याचाच उपयोग उमेदवारी निश्चित करण्यासाठी होईल.