बीएएसएफचा कपाशी पीक परिसंवाद – चारसूत्री व्यवस्थापन वर केले मार्गदर्शन

चोपडा, (प्रतिनिधी ) -. चोपडा येथील अक्कासाहेब सौ.शरदचंद्रिका सुरेश पाटील नगरपालिका नाट्यगृह चोपडा बीएएसएफ कंपनी मार्फत महाचर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी विवेक पाटील व सिद्धार्थ वाजगे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकामध्ये रसशोषक किडी व गुलाबी बोंड अळी करिता ४५ – ५५ – ६५ – ७५ दिवसाच्या चारसूत्री व्यवस्थापन वर मार्गदर्शन केले

. केळी वरील करपा थांबवण्या करिता मार्गदर्शन केले पपई,कांदा, मका या पिकांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येण्यासाठी कोणत्या औषधीचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दिनानाथ इंगळे आणि योगेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले व सर्व बीएसएफ जळगाव प्रतिनिधी कल्पेश राणे , तुषार काकर , अनिल महाजन , दिनेश राजपूत , विजय पाटील , मयुर डाखुरे , दिनेश पाटील , प्रवीण पाटील , ज्ञानदीप पाटिल, अमोल पाटील यांनी सहकार्य केले यावेळी चोपडा व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.