भुसावळमध्ये स्वातंत्रदिनी दावत-ए-इस्लामी हिंद तर्फे भव्य तिरंगा रॅली व रक्तदान शिबीर संपन्न ;

भुसावळ,(प्रतिनिधी ) –
79 वा स्वातंत्र्य दिन व 1500 वा ईद मिलादुन्नबी निमित्त दावत-ए-इस्लामी हिंद व त्यांचा सामाजिक सेवा विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (जीएनआरएफ) तर्फे भुसावळमध्ये दोन भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी तिरंगा रॅली व दुपारी रक्तदान शिबीर घेण्यात आले .

अमरदीप चौक येथून काढण्यात आलेल्या रॅलीत मदरशातील शेकडो मुले पांढऱ्या वेशात व पगडीसह, हातात तिरंगा घेऊन “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा” हे गीत व देशभक्तीपर घोषणांसह मार्गस्थ झाली रॅली रेल्वे स्टेशन, मॉर्डन रोड, जाम मोहल्ला, खडका रोड मार्गे रजा टॉवर येथे समाप्त झाली मार्गात नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी केली तसेच सहभागी विद्यार्थ्यांना जलपान सेवा देऊन सहभागींचे स्वागत केले .
दुपारी 2 ते सायं 6 या वेळेत सुन्नी जामा मशीद, जाम मोहल्ला समोर जीएनआरएफ तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले . यात शहर व आसपासच्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व एकूण 51 युनिट रक्त संकलित झाले, जे गरजूंना उपलब्ध करून दिले जाईल। सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले।


दावत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांनी सांगितले की अशा प्रकारचे रक्तदान शिबीर संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्य व जिल्ह्यात आयोजित केले जात आहेत। या कार्यक्रमांचा उद्देश देशभक्ती, एकता, बंधुता व मानवसेवेची भावना प्रोत्साहित करणे हा आहे।
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत दावते इस्लामी जळगाव जिल्हा अध्यक्ष जुबैर अत्तारी , जीएनआरएफ जिल्हा निरीक्षक रफिक रोशन कादरी , भुसावळ शहर निरीक्षक अब्दुल सईद , शोएब अत्तारी, हाफिज कासिम, मौलाना झुल्फिकार मिस्बाही, मौलाना साजिद, कारी खालिद, कारी इद्रीस, अझहर कादरी, खालिद अत्तारी व आसिफ अत्तारी यांचे विशेष योगदान होते.

कार्यक्रमाच्या शेवटी भारताच्या अखंडता, समृद्धी व शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली