लॉकडाऊनमुळे नैराश्य : रावेरच्या विद्यार्थ्यांची नाशिकमध्ये आत्महत्या

रावेर : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने करण्यात आले आहे गेल्या महिन्यापासुन असलेल्या या लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर गाडया सुरु होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नसल्याने या लॉकडाऊनच्या नैराश्याने रावेर येथील एका विद्यार्थ्याने नाशिक येथे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुपेश भरत पाटील (वय २०) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
मयत रुपेश पाटील हा नाशिक येथे एसवाय बी.ए.चे शिक्षण घेत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे रेल्वे,बस आणि वाहतुकीची सर्व साधने बंद झाल्यामुळे रुपेश याला घरी जाता आले नाही. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने नाशिक येथे आत्महत्या केलीआहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *