भुसावळ मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धर्म वीर मीना यांनी (प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे १७.०६.२०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमात भुसावळ विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्काराने सन्मानित केले.

कर्तव्या दरम्यान दक्षता दाखवून संभाव्य अपघात टाळण्यामध्ये आणि रेल्वेच्या सुरक्षित रेल्वे संचालनात मोलाचे योगदान दिल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येक पुरस्कारात पदक, गौरव प्रमाणपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्र व ₹ २०००/- रोख रक्कम देण्यात आली.
भुसावळ विभागातील पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची माहिती
उदय प्रताप पटेल, वरिष्ठ विभाग अभियंता (पीवे), बोदवड
०९.०४.२०२५ रोजी मलकापूर स्थानकावर कामावर असताना, मलकापूर स्थानकात मालगाडीच्या १६ व्या वॅगनमध्ये असामान्य स्थिती आढळली. त्यांनी ताबडतोब संबंधित सर्वांना माहिती दिली ट्रेन ताबडतोब थांबवण्यात आली आणि तपासणीत असे दिसून आले की उक्त वॅगनचा EM पॅड वितळलेला आढळला, पुढच्या चाकाचा ब्रेक पॅड गहाळ होता आणि समोरचा एक्सल वाकडा होता. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली. दर्शन राजेश चंदन, पॉईंट्समन, गायगाव
१९.०५.२०२५ रोजी एका मालगाडीसोबत सिग्नलची देवाणघेवाण होत असताना ४२ व्या वॅगनमध्ये गरम ऍक्सल दिसले. त्यांनी त्वरित माहिती दिल्यामुळे पुढील पारस स्थानकावर गाडी थांबवून वॅगन अनफिट घोषित करण्यात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांच्या कर्तव्यांप्रती असलेल्या सतर्कतेबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक करताना, महाव्यवस्थापक म्हणाले की अशा सतर्कता आणि समर्पणाच्या कृतींमुळे इतरांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास आणि जीवितहानी, मालवाहतूक आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यास प्रेरित केले जाईल.
या प्रसंगी प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक ,श्री चंद्रकिशोर प्रसाद, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी तसेच अन्य प्रधान विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



