विजेच्या स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू: मुलीस वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत ! :रावेर तालुक्यातील तासखेडा येथील घटना ;


रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील तासखेडा येथे मुलीला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागताच तिला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्यालाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी दि. १३ रोजी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.

समाधान तायडे (वय ३६ वर्ष) व मुलगी मानवी समाधान तायडे (वय ९ वर्ष) अशी मयत पितापुत्रीचे नाव आहे.समाधान तायडे हा केळी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता.(केसीएन)आज दि. १३ जून शुक्रवार रोजी सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान रावेर तालुक्यातील तासखेडा येथे घराजवळ मुलगी मानवी खेळत होती. तेव्हा तिला उघड्या जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श झाला. स्पर्श होताच मानवीला विजेचा जबर धक्का बसला. जवळच असलेले तिचे वडील समाधान हे मुलीला वाचविण्यासाठी धावले असता त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. दोघांचा मृतदेह भुसावळ येथे ट्रामा केयर सेंटरला दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे तासखेडा येथे शोककळा पसरली आहे.