शिक्षकांचे कुटुंब उध्वस्त करणाऱ्या प्रशिक्षणाने अखेर साधणार काय ? शिक्षकांचे ज्येष्ठ नेते प्र. ह.दलाल यांचा संतप्त सवाल !


राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक यांचा जाहीर निषेध!
भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक 2 जून पासून राज्यातील सुमारे 40 / 45 हजार माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी चे प्रशिक्षण राज्यभरात एकाच वेळी सुरू झालेले आहे सदर प्रशिक्षण सुरू होताच तांत्रिक अडचणीमुळे गोंधळात सापडले आहे त्यातच प्रशिक्षणार्थींसाठी रुपये 2000 प्रत्येकी वसूल करून कोणत्याही मूलभूत सोयी सुविधा परीक्षा केंद्रावर नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित राहण्याला अगदी दोन-तीन मिनिट जरी उशीर झाला तरी अनुपस्थित समजण्याच्या संचालकांच्या फतव्यामुळे अगदी 50 60 km अंतरावरून सकाळी सात वाजता एसटी मिळाली नाही तर रिक्षा वगैरे करून धावपळ त येणारे शिक्षक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत ह्या ताणतणावामुळेच चिपळूण हून रत्नागिरीला प्रशिक्षण केंद्रावर जाणाऱ्या शिक्षकांच्या मिनी बसला प्रचंड अपघात होऊन त्यात अनेक शिक्षक शिक्षिका गंभीर जखमी झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी जाचक अटी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करणे आवश्यक असून शासनाने त्यांच्या अशा बेजबाबदार कार्यप्रणालीची चौकशी करावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे सदस्य व शिक्षकांचे ज्येष्ठ नेते प्र. ह.दलाल यांनी केली आहे

शिक्षकांना शिस्त शिकविणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र नियोजना प्रचंड अपयश आले आहे. मग त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न दलाल यांनी उपस्थित केला आहे. प्रशिक्षणाची वेळ सकाळी नऊ 15 अशी आहे सुमारे 50 – 60 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या शिक्षकांना सकाळी सात वाजता निघावे लागते एसटी मिळाली नाही तर रिक्षा वगैरे जे वाहन उपलब्ध होईल त्याने घाई गर्दी करून यावे लागते. एवढे करून प्रशिक्षणातून नेमके काय पदरात पडते हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे ज्यांचे स्वतःचे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी चे प्रशिक्षण झालेले नाही ज्यांची सेवा 12 वर्षांपेक्षाही कमी आहे असे डीएड शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण देत आहेत विनोदच म्हणावा लागेल अनेक शिक्षक 50 किंवा त्यापुढे वय असलेल्या असून अनेकांना मधुमेह अशा विकारांनी ग्रासले आहे अशांसाठी सात आठ तास बसून प्रशिक्षण घेणे तारेवरची कसरतच म्हणावी लागते दर दर तासाला परीक्षा घेण्यापेक्षा शेवटच्या दिवशी अंदाज शंभर मार्कांचा पेपर घ्यायला काय अडचण होती? अशा अनेक समस्यांच्या चक्रात प्रशिक्षण अडकले आहे. यावर विचारमंथन करून निदान पुढील प्रशिक्षण तरी व्यवस्थित आणि परिणामकारक रित्या आयोजन आयोजित करण्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ठरविले पाहिजे. सर्व प्रशिक्षणार्थीने मंगळवारी काळी फीत लावून प्रशिक्षण पद्धतीचा निषेध व्यक्त करावा असे आवाहन दलाल यांनी केले आहे.