भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची जळगांव जिल्हा समिती गठित

जळगांव, ८ जून २५: आज जळगांवमध्ये भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची बैठक शासकीय विश्राम गृह “पद्मालय” येथे झाली. या बैठकीचे संचालन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या पत्रानुसार करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जळगांव जिल्हा समितीच्या गठनासंबंधी चर्चा करण्यात आली.

बैठकीला जिल्ह्यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीत बाबुराव वाघ यांनी भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे कार्य विस्तृतपणे मांडले.

जिल्हा समितीची नव्याने निवड
सदर बैठकीत जिल्हा समितीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस बाबूराव वाघ, उपाध्यक्ष सुमित सोनवणे (जळगाव व जामनेर विभाग), विवेक नरवाडे (भुसावळ विभाग), सुरज उर्फ कांतिलाल गाढे (रावेर-यावल विभाग), बी. के. बोदडे सर (बोदवड विभाग), कोषाध्यक्ष दिनेश इखारे, संघटक राहुल वाघ, सह संघटक रोशन गाढे, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण धुंदले, जिल्हा समन्वयक नगीनदास इंगळे, कायदेशीर सल्लागार प्रवीण सुरवाडे जिल्हा सदस्य बाळू शिरतुरे, प्राजक्ता तायडे असे सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली.

यावेळी, जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. समितीत पहिला ठराव म्हणून दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. यासाठी सूचक राहुल रतन वाघ आणि अनुमोदक विवेक भीमराव नरवाडे होते.

समारोप
शेवटी अध्यक्षीय भाषणात जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार यांनी समितीच्या आगामी कार्याची रूपरेषा मांडली. बैठकीचे सुत्रसंचालन बाबुराव वाघ यांनी केले, तर प्रशांत गाढे यांनी उपस्थित्याचे आभार प्रदर्शन केले. सर्वांच्या सहाय्याने बैठक यशस्वीपणे संपन्न करण्यात आली.