भुसावळ (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन कार्याचा , त्याग आणि समर्पण. विचार आजच्या पिढीला ज्ञात व्हावे नुकताच मुंबई विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरअभ्यास व संशोधन केंद्राची स्थापना राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन , मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सांस्कृतिककार्य मंत्री एडवोकेट आशिष शेलार,यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वि. दा सावरकर यांच्या 142 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला करण्यात आल .

स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर विद्वान ,पुरोगामी, विचारवंत इतिहासकार ,समाज सुधारक होते. अग्रगण्य समाज सुधारक होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला पाप आणि माणुसकीला कलंक मानल. ते रूढीवादाच्या विरोधात उभे राहिले आणि दलितांना मंदिरात प्रवेशासाठी त्यांनी लढा दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांच्या कार्याचे आणि वचन पद्धतीचे कौतुक केले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांना स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकरांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी त्यांनी केलेला त्याग ,समर्पण आदी त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दलची माहिती , इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा आणि त्यांच्या या कार्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठाप्रमाणे उत्तर महाराष्ट्र कवयत्री बहिणाबाई विद्यापीठात सुद्धा त्वरित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राची स्थापना करण्यात यावी.
अशा मागणीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिष्य दिनकर जावळे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविलेले आहे



