मुंबई –

रोजच्या वाढत्या महागाईच्या काळात नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले.
या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती.
मूळ प्रस्तावात काय आहे ?
महावितरणने राज्यभरातील 2.75 कोटी ग्राहकांसाठी मूळ प्रस्तावात सरासरी 7 ते 9 टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली होती. यामध्ये 100 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्याच वीजदरांमध्ये पाच पैसे प्रति युनिटची (0.85 टक्के) कपात, तर त्यापुढील श्रेणीतील ग्राहकांसाठीच्या वीजदरांमध्ये 101 ते 300 युनिटसाठी 9.95 टक्के, 301 ते 500 युनिटसाठी 7.82 टक्के व 500 युनिटपुढील वीज वापरासाठी 1.28 रुपये प्रति युनिट वाढ प्रस्तावित केली होती.
महावितरणचे 2025-26चे दर
श्रेणी सध्या नवीन वाढ/घट
0-100 —.88 –.32 –टक्के वाढ
101-300 —.45 –.56 –नाममात्र वाढ
301-500 —.72 –.73 –टक्के घट
501-1000 —.81 –.41 –टक्के घट


