भुसावळात रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी ;

भुसावळ दिनांक ,७ फेब्रुवारी रोजी गुरु चंद्रमणी बुद्ध विहार, पंढरीनाथ नगर जामनेर रोड भुसावळ येथे मोठ्या उत्साहाने रमाई जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी. वाय. एस. पी. कृष्णांत पिंगळे ल हे उपस्थित होते .

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. माता रमाई व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करण्यात आले. डी.वाय.एस.पी. कृष्णांत पिंगळे 3. यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे घडले ते महामानव कसे झाले, त्यांच्या मागे असलेल्या माता रमाई यांची साथ कशी होती याविषयी मोलाचे मार्गदर्शन करून प्रत्येक पुरुषामागे स्त्री चा खूप मोठा वाटा असतो त्याशिवाय पुरुष घडूच शकत नाही हे पटवून दिले. तसेच महिलांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची खूप भीती असते, त्या भीती विषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करून महिलांना प्रेरणा दिली. सावित्रीच्या लेकी ग्रुप, आज जे कार्य करत समाजसेवा करत आहेत त्याविषयी त्यांनी त्या ग्रुपचे कौतुक केले. डॉ. प्रा. मनोहर संदानशिव सर आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह कसा जोडला गेला याविषयी सविस्तर माहिती दिली व माता रमाई ने केलेल्या त्यागाची आठवण करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात शीला गुरचल हिने अतिशय सुंदर गीत गायन करून केली. त्यानंतर तेजस्विनी केदारे, शुभांगी वानखेडे, गंगा साळवे, अनिता तायडे, विमल निकम, आत्माराम मेढे, एस .एस. केदारे यांनी सुंदर गीत गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच पोर्णिमा केदारे यांनी माता रमाई वर कविता सादर केली, प्रिया मेढे, वर्षा ठाकरे, वैशाली सावकारे, सुनिता तायडे, मा.नगरसेविका सोनल महाजन, रेखा खेडकर यांनी रमाई विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गरजू महिलांचा माता रमाई जयंती निमित्त साडी देऊन डी वाय एस पीपिंगळे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदाकिनी केदारे तर आभार प्रदर्शन मीरा जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीच्या लेकी ग्रुप यांनी परिश्रम घेतले.