भुसावळ – ३१ जानेवारी २४ ला काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या २२ दुकानांना आग लावून बेचिराख केले त्या २२ दुकानदारांना अद्याप पर्यंत पालकमंत्री ना गुलाबराव पाटील हे त्या गावाचे असून सुद्धा सहानुभूती मिळाली नाही एवढेच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना गिरीश महाजन सुद्धा जळगाव जिल्ह्याचे असून त्यांनी सुध्दा नुकसान भरपाई दिली नाही म्हणून त्या आगग्रस्त प्रशासनाला सात दिवसापूर्वी नोटीस दिली होती की जर नुकसान भरपाई मिळाली नाही व आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला उपोषणाला बसू त्यानुसार २५ जानेवारी शनिवार रोजी दुपारी चार वाजेपासून या साखळी उपोषणाला सुरुवात झाली.
सदरचे उपोषण जी एस ग्राउंड च्या मैदानावर सुरू आहे योगायोग म्हणजे ज्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली त्याच्या समोरच आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे कार्यालय आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचलाच असेल व त्यांनी त्यावर त्वरित निर्णय द्यावा व आपल्या जिल्हावासीयाना मदत करावी असे आवाहन जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख, संघटक नदीम मलिक, मजहर पठाण, अनिस शहा आदींनी केली आहे.

२२ आगग्रस्त दुकानदार सहकुटुंब उपोषणाला
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला दुकानदारातील पुरुषांसह महिला व बालकांचा सुद्धा या उपोषणात सहभाग होता.
२६ जानेवारी पासून साखळी उपोषणाला सुरुवात
७६ व्या प्रजासत्ताक दिनापासून साखळी उपोषण सुरू राहील जर तीन दिवसात शासनाने आवश्यक ती कारवाई न केल्यास सदरचे साखळी उपोषण आमरण उपोषण मध्ये करण्यात येईल असे दुकानदारांच्या वतीने हाजी हमीद मणियार यांनी सांगितले.
उपोषणाला बसलेले दुकानदार सह इतर मान्यवर भुसावळ मुस्लिम यांचे मंचचे संस्थापक अध्यक्ष साबीर शेख व मुनवर खान सलीम गवळी आदी


