भुसावळ – राष्ट्र सेविका समिती देश सेवेचे कार्य करते,समाज मनात देश प्रेमाचे भाव निर्माण करते ही महिलां समिती याच उद्देशाने संपूर्ण भारतात काम करत असते.
याचाच एक भाग म्हणून ,
समितीने वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहे या निमित्तानेआज दिनांक 25/01/2025 शनिवार रोजी सामुहीक “वंदे मातरम् “या आपल्या राष्ट्रीय गीताचा उपक्रम राबविला .
बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी1876 साली आनंदमठ या आपल्या कादंबरी मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केले.
भारतीय स्वतंत्रता चळवळीत या गाण्याने फार महत्त्वाची भूमिका बजावली. हे गाणे नंतर भारत सरकारने राष्ट्रीय ध्वज संहितेत समाविष्ट केले.
वन्दे मातरम् हे गाणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्या मुळे भारतीय लोकांमध्ये देश भक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण झाली.
आपल्या समृध्द सांस्कृतिक वारसाची आणि भारताला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र बनविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानाची ही आठवण आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे गाणे आपल्याला रक्षण आणि रक्षण करण्याच्या आपल्या कर्तव्याची आठवण करून देते .
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गाण्याचा दीर्घ आणि समृध्द इतिहास आहे. जो भारतीय स्वतंत्र लढ्याशी अतूट पणे जोडलेला आहे.असे हे भारताचे राष्ट्रीय गीत भारतीय शास्त्रीय संगीताचे अनमोल रत्न आहे.
अशा या वन्दे मातरम् गीताला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीने ,भुसावळ शहरातील शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सामुहीक वंदे मातरम् गीताचा उपक्रम 25/01/2025 शनिवार रोजी सकाळी 10 ते 11 मध्ये घेण्यात आला. या उपक्रम मध्ये अहिल्यादेवी शाळा, कोटेचा विद्यालय, के. नारखेडे, ऐन के नारखेडे, बियाणी स्कूल, गोदावरी शाळा, वर्ल्ड स्कूल भुसावळ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष सौ. कल्याणी ताई ओक, प्रांत धार्मिक प्रमुख राष्ट्र सेविका समिती भुसावळ, प्रमुख वक्ता डॉ.श्री. जगदीश प्रसाद जी सूचिक यांनी मार्गदशन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्र सेविका समिती शाखा भुसावळच्या सर्व पदाधिकारी तसेच सेविका यांनी केला आहे.



