जळगाव –
निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक 19 जानेवारी रोजी कोठारी नगर येथे चार वाजता हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.51 महिलांना वाण देण्यात आले एक आगळे वेगळे असे हे हळदीकुंकू ठरले. निसर्ग व पर्यावरणाची कास धरून वृक्ष संवर्धन व वृक्ष जोपासना या भावनेतून हळदी कुंकवाचे वाण प्रत्येक महिलेला शेवंती रोप देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ हर्षदा पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले. त्यांनी बोलताना सांगितले. पर्यावरणाची काळजी घेताना प्रथम घरापासूनच आपण सुरुवात करावी घरातील वेस्टेज कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करावे तेच खत आपण झाडांसाठी वापरावे. याबद्दल त्यांनी माहिती दिली.


सोबतच त्यांनी वाढदिवसानिमित्त कमीत कमी एक झाड लावा व त्यांचे संवर्धन करा नैसर्गिक पद्धतीने लागवड केलेल्या भाजीपाला आणि धान्य फळे यांचा खाण्यात जास्तीत जास्त वापर करा. पाणीबचत साठी पाणी जपून वापरा. प्लास्टिकचा वापर टाळा कारण प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तरी प्रत्येकाने कापडी पिशवी वापरायला हवी. सॅनिटरी पॅड चा वापर आणि काम झाल्यावर त्याचे व्यवस्थापन योग्य विल्हेवाट योग्य पद्धतीने प्रत्येक महिलेने करणे आवश्यक आहे. आयुर्वेद व पर्यावरणाचा फार जवळचा संबंध आहे म्हणून आयुर्वेदिक जीवनशैलीचा वापर करा आयुर्वेदात सांगितलेल्या दिनचर्या ऋतुचर्या पंचकर्म यांचा शरीर निरोगी राखण्यासाठी अवलंब करा. जर महिलांचे स्वास्थ्य आरोग्य चांगले असेल तर आपोआप कुटुंबाचे आरोग्य देखील चांगले राहते आणि पर्यायाने समाजव्यवस्था सुद्धा चांगली घडते असे प्रतिपादन डॉ हर्षदा पाटील यांनी केले. याप्रसंगी ह.भ.प दिव्या ताई खलाणे यांनी देखील महिलांना मनस्वास्थ्य कसे राखावे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी महिलांना आवाहन केले हळदीकुंकू अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण संतुलन आरोग्य स्वास्थ राखण्यासाठी महिलांनी अशा प्रकारे आयोजन करून निसर्ग व सामाजिक पर्यावरणचें जतन करावे.यावेळी वंदना मंडावरे हर्षा गुजराती किमया पाटील शिल्पा बयास हर्षाली तिवारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचालन संगीता चौधरी तर आभार नेहा जगताप यांनी मानले.



