भुसावळ – राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची दिंडोरी पिटताच, प्रशासनाला मतदार जागृती करण्याचे वेध लागले.,अन् नेहमीप्रमाणे हक्काचे वेठबिगार म्हणून शिक्षकांसह विद्यार्थ्यांना धरले वेठीला!
कोणती योजना केव्हा कोठे कशी राबवावी म्हणजे तिची उद्दिष्ट सफल होईल याचे काही तारतम्य च अधिकाऱ्यांना राहिले नाही.निवडणूक येताच मतदार जागृती,मतदान राष्ट्रीय कर्तव्य,हे चावून चावून चोथा झालेले विषय पुन्हा चर्चेत येतात व घाई घाईने कसेही निर्णय घेतले जातात .असाच प्रकार भुसावळ गट शिक्षणाधिकारी यांनी दि.१६रोजी संध्याकाळी एका पाठोपाठ एक ४/५आदेश माध्य.शाळांसाठी काढून मोकळे झाले.
कोणाच्या खांद्यावर ,कोणाचे ओझे!
खर म्हणजे मतदार जागृती करणे हा अज्ञान बालकांचा विषय नाहीच.आणि तेही प्रथम सत्र परीक्षा काळात त्यांचे शिक्षणीक नुकसान करण्याचा हा प्रकार नाही?मतदार जागृती हा राजकीय,सामाजिक उपक्रम आहे. गल्लो गल्ली स्वतःला नम्र समाजसेवक म्हणवून मिरवणारे मोठ्या संख्येने उपलब्ध असताना त्यांना व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सोडून ज्यांचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या विद्यार्थ्यांच्या माथी का मारतात निरर्थक योजना?तेही परीक्षा काळात.
आदेश किती चमत्कारी!!
एका आदेशात म्हटले आहे
की,मतदान जागृती ,मतदानाचा हक्क वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना संकल्प पत्र लिहून पोहच घ्यावी.मतदानाचा हक्क वाढविणे म्हणजे नेमके काय? व तो हक्क वाढला की नाही हे नंतर मीटर,लिटर,किलो ने मोजणार काय? हक्क वाढतो हा एक नवा अजब शोध l!दुसऱ्या पत्रात ,लगेच दुसऱ्या दिवशी पथनाट्य सादर करायला सांगितले.पथनाट्य सादर करणे म्हणजे बाजारात जावून भाजी आणणे इतके सहज सोपे आहे का ? त्यासाठी विशिष्ट भाषा शैलीत लेखन करणे,योग्य विद्यार्थ्यांची निवड करणे,प्रत्येकाला भूमीका समजावून देणे,सराव करणे हे एकाच दिवशी शक्य आहे?
निबंध,वक्तृत्व,रांगोळी,चित्रकला,घोष वाक्य,स्पर्धा तालुका पातळीवर घ्या म्हणे.तेही परीक्षा काळात!
विद्यार्थ्यांच्या निबंध वक्तृत्वाने वाढेल मतदान टक्का?
विद्यार्थ्यांनी कितीही अभ्यासपूर्ण भाषण केले,निबंध लिहिले तरी मतदार शाळेत येवून ती ऐकतील,वाचतील का? मग ह्याने मतदार जागृती होईलच कशी?
चूनावी पाठशाळा आयोजित करा! चूनावी पाठशाळा ही कोणती मराठी? विद्यार्थ्यां साठी निवडणूक साक्षरता मंच स्थापन करा.त्यासाठी तत्परतेने तालुक्यातील ६२मुख्याध्यापकांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त ही केले!
हे सर्व उपक्रम न.पा.,पंचायत समिती,तहसीलदार कार्यालय,यांनी ग्राम सभा, आठवडे बाजार,चौक,मंदिर,गर्दीची,ठिकाणे आयोजित केले तर उद्दिष्ट तरी सध्या होईल .पण ही साधी गोष्ट समजली तर ते अधिकारीच कसले?
खर तर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांना बाणेदार पणाने सांगायला हवे की ,परीक्षांचा काळ आहे,शिवाय विद्यार्थ्यांचे हे काम नाही योजना उद्दिष्ट यातून सध्या होईल असे नाही ह्यासाठी समाज सहकार्य घेणे उचित होईल . पण.. असे रामशास्त्री बाण्याचे अधिकाऱ्यांचा काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला आहे हेही वास्तव स्वीकारावेच लागेल.असेही दलाल म्हणाले आहे



