मुंबई – दि १० : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम (67) यांचे शनिवारी राहत्या घरी सकाळी निधन झाले. गत दीड वर्षांपासून कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. शनिवार, 10 रोजी वाजता दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. विय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली.
विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात. त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात राहिले. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. विशेषतः विच्छा माझी पुरी करा, रथचक्र, व टूर टूर ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. त्यांनी चित्रपट क्षेत्रावरही स्वत:ची पकड मजबूत ठेवली होती. चष्मेबहाद्दर, पोलिसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं आणि आम्ही दोघं राजा राणी या सारख्या चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप उमटवली.

विजय कदम यांच्यावर साधारणतः वर्षभरापासून कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते. गतवर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. विजय कदम यांच्यावर 4 किमोथेरेपी आणि 2 सर्जरी झाल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते.


