मुक्ताईनगर :-

मुक्ताईनगर मतदार संघातील काही भागात काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले असून मतदार संघात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समवेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार, कृषी अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व पातोंडी भागात येथे काल झालेले वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये केळीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानाची पहाणी करण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर तहसिलदार गिरीश वखारे तसेच संबधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दीले आणि सरकारकडून शेतकरी बांधवाना जास्तीत जास्त प्रमाणात मदत करण्याचे आश्वासित केले.
बोदवड तालुक्यातील मनुर खु॥, चिंचखेडा सिम व शिरसाळा भागातील गावांमध्ये काल झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती, घरे, पशु-जनावरे यांचे नुकसान झाले असून, बोदवड तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, बोदवड तहसीलदार, संबंधित गावातील ग्रामसेवक, शिवसेना पदाधिकारी, बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक, कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मंडळी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील मतदारसंघातील मौजे तांदलवाडी गावातील काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. तसेच गावातील विजेचे पोल पडून भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाची पहाणी करुन रावेर तहसिलदार तसेच संबधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दीले आमदार पाटील यांनी दिले.
याप्रसंगी माजी जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, श्रीकांत महाजन, योगेश पाटील, निरंजन तायडे तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मंडळी व शेतकरी बांधव उपस्थिति होते.
नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे दिले आदेश
मंत्री महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. दरम्यान जिल्ह्यात तापमानाने उच्चांक केला असून नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आवाहनही करण्यात आले.
केळी बागांचे झाले आहे नुकसान
गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने केळी बागेचे नुकसान होत असताना शनिवार रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मतदार संघातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरांवरील पत्र उडाल्याने संसार उघड्यावर आले आहे.



