सत्तेचा गैरवापर करीत मोदी सरकारने शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले – दहा वर्षात जनतेसाठी काय केले हे जनतेला सांगा : शरद पवारांची भुसावळात टिका : श्रीराम पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन :

भुसावळ – केंद्रातील सरकारने कायमच शेतकर्‍यांच्या विरोधात काम केले आहे. या सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे, अशी टीका केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथील संतोषीमाता हॉल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी भुसावळातील संतोषी माता सभागृहात जाहीर मेळावा झाला यामेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

मोदींच्या काळात सर्वाधिक सत्तेचा दुरुपयोग
शरद पवार पुढे म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मोदींनी यापैकी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. मात्र या काळात सत्तेचा दुरुपयोग करीत सत्ता जनतेच्या भल्यासाठी न वापरता ती स्वार्थासाठी वापरली ,आम्ही शेतकर्‍यांसाठी काय केले असे मोदी आम्हाला विचारतात मात्र त्यांनी दहा वर्षात काय केले हे आता जनतेला सांगावे, असा घणाघात माजी कृषि मंत्री व शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली

माजी कृषि मंत्री शरद पवार आपल्या शैलीत म्हणाले की, या निवडणुकीकडे देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत तुमच्या-आमच्या सारख्या लोकांचा समुदाय एकीकडे तर दुसर्‍या बाजूला ज्यांच्याकडे दहा वर्ष ज्यांची सत्ता होती ते लोक उभे आहेत. 2014 मध्ये ज्यावेळी मोदी यांनी मते मागितली त्यावेळी त्यांनी महागाईच्या नावावर मते मागितली. त्यांनी दहा वर्षातील लेखाजोखा जनतेपुढे मांडावा, असेही पवार म्हणाले.

गरीबांना वर्षाकाठी खात्यात १ लाख रुपये देणार –

भाजपा सरकारच्या काळात देशातील उद्योग गुजरात राज्यात पळवून बेरोजगारी वाढवण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला.
जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही केली परंतू भाजपाने नकार दिला मात्र आम्ही सत्तेवर आल्यावर ही मागणी पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिलें गरीबांना वर्षाकाठी खात्यात एक लाख रुपये देण्यात येतील, उच्चशिक्षीत बेरोजगारांना स्टायपेंड दिली जाईल, शेतकऱ्यांवर लादलेले सर्व कर रद्द करू, असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.कोरोना काळात सर्वात चांगले काम उद्धव ठाकरे सरकारने केले मात्र सरकार पाडण्यात आले मात्र आता त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. देशात व राज्यात मोदी सरकारविषयी प्रचंड संताप आहे. महागाईचा आलेख वाढला आहे, शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट करण्यात आल्याने शेतकरी संतप्त आहेत, उद्योग गुजरातला पळवून नेले जात असताना पीएम, गृहमंत्री काहीच बोलायला तयार नाही, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला. .
एकनाथ खडसे यांची पक्षातून काढावे – माजी आं.संतोष चौधर

खडसेंमुळे पक्षाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. आता त्यांना पक्षातून काढावे व एकदाचा संपूर्ण खडसे परिवाराचा विषय राष्ट्रवादीतून संपवावा, असे चौधरी म्हणाले. खरं तर भुसावळ जिल्हा होणार होता मात्र खडसेंनी त्यास मोगरी लावली मात्र आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची सत्ता आल्यानंतर हा विषय मार्गी लावावा, असेही ते म्हणाले. खडसेंचा भाजपात प्रवेश होणार नाही मात्र तरीदेखील ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. खडसे यांच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी होती, असेदेखील चौधरी म्हणाले. खडसेंमुळे पक्षाचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यांना पक्षातून काढावे व संपूर्ण परिवारास घरी बसवावे अशी अपेक्षा व्यक्त करीत भुसावळ ला जिल्हा करावा अशी मागणी मा आ. संतोष यांनी यावेळी केली गेले दहा वर्षात यांनी काय काम केले ? एकनाथ खडसेंनी स्वताहून राजीनामा द्यावा आता त्यांची घराणेशाही संपवण्याची वेळ आली आहे. जनता गद्दाराना धडा शिकवणारच यासाठी येणाऱ्या दिनांक ७ ते ११ मे ला भुसावळात महाविकास आघाडीचे उमेदवार यांची एक मोठी सभा आपल्या उपस्थितीत आयोजित करायची आहे आपण वेळ दिल्यास एक लाखांच्या वर कार्यकर्ते सभेला उपस्थित राहतील अशी ग्वाही माजी आमदार संतोष चौधरी यांनी यावेळी शरदजी पवार यांना दिली.

संविधान हे आमचे धन असून संविधान वाचविण्यासाठी श्रीरामदादा पाटील यांना संसदेत पाठविणार असल्याचे ठाम वक्तव्य जगन सोनवणे यांनी यावेळी केले .तर उमेदवार श्रीराम पाटील यांनी जनतेच्या विश्वासाला तडाजावू देणार नाही समाजसेवा शासनाची जोड मिळावी म्हणून राजकारणात आलो आहे प्रामाणिकपणे काम करेल दिपनगर, वरणगाव फॅक्टरी सह अनेक प्रलंबित प्रश्न रोजगार मेगा रिचार्ज ,शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे याकरिता जनतेचा सेवक म्हणून काम करेल विश्वास हीच प्रॉपर्टी असल्याची ग्वाही उमेदवार श्रीराम पाटील यांनी यावेळी दिली . यावेळी प्रतिभा शिंदे, यांचेसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार श्रीराम पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, प्रतिभा शिंदे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.