शहरात झालेल्या रस्त्यांची कामे व सुरू असलेली कामे ही निकृष्ट दर्जाची – दिपक धांडे :

भुसावळ – मामाजी टॉकिज रस्त्याचे गेल्या पाच वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यावेळी हा रस्ता २५ वर्षे टिकेल असे सांगण्यात आले होते. मात्र पाच वर्षातचं काँक्रीटीकरण रस्त्यांवरील खडी रस्त्यावर दिसू लागली आहे. गवळीवाडा, मामाजी टॉकीज रोड अश्या अनेक ठिकाणी खडी निघाली आहे. त्यामुळे आता रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होतं आहे.भुसावळ शहरात असे अनेक रोड आहे तिथे डांबरीकरण चांगलं असतांना सुद्धा त्यावर आमदार निधीतून काँक्रिटीकरण करण्यात आलं आहे. जिथे काँक्रिटीकरण आहे तिथे गट्टू बसवण्यात आले आहे. असा शासनाच्या निधीचा अपव्यय हा शहरात सुरू आहे. बऱ्याच रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित ठेकेदाराला दंड ठोकवण्यात आला पाहिजे. पंचवीस वर्षे काय तर रस्ता पाच वर्षेही टिकला नाही असे सामाजिक कार्यकर्ते दीपक धांडे यांनी सांगितले.