भुसावळातील रेल्वे उत्तर वॉर्डातील अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन कधी ? – म्हाडाची घरकुले होणार कधी ? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे प्रशासकांना निवेदन

भुसावळ : शहरातील रेल्वे उत्तर वॉर्डातील अतिक्रमण 15 ते 18 नोव्हेंबर 2018 दरम्यान काढण्यात आले मात्र पाच वर्षानंतरही अतिक्रमण धारकांचे पुर्नवसन करण्यात आलेले नाही शिवाय त्यांना हक्काचे घर मिळालेले नाही. सुमारे 70 वर्षांपेक्षा अधिक काळापासून रहिवासी राहत असताना त्यांना बेघर करण्यात आले मात्र त्यांना अद्याप हक्काचे घरकुल मिळालेले नाही.
म्हाडाच्या माध्यमातून 17 हजार 600 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर त्यातील पहिल्या टप्प्यात 3600 घरे बांधण्यात येणार आहेत मात्र ज्या जागेवर घरकुल उभारण्यात येणार आहे त्या जागेवर आरक्षण अद्याप हटवण्यात आले नसल्याने प्रकल्प रेंगाळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुसावळातील सभेत पाच हजार विस्थापीताना मोफत घरे देण्याची घोषणा केली होती शिवाय त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणणीस यांनीदेखील पंतप्रधान योजनेंतर्गत मोफत घरे बांधून देण्याची घोषणा केली होती. लोकप्रतिनिधींनी केलेल्या घोषणांची पूर्ती व्हावी तसेच प्रशासनाने या संदर्भात तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षातर्फे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देवून करण्यात आली.

निवेदन देताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे, जिल्हा संघटक छोटेलाल हरणे, भुसावळ तालुकाध्यक्ष संदीप सपकाळे, शहर संघटक शशी रायमळे, नरेंद्र म्हस्के, रवींद्र साळवे, सत्यवान निकम, अशोक साळवे, अंबादास प्रकाश सोनवणे, मनोहर लक्ष्मण निकम, प्रशांत विष्णू डांगे, यशवंत उखाजी वारूळकर आदींची उपस्थिती होती.