भुसावळ – राज्यातील घटनाबाह्य ईडी सरकार सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे तसेच सरकारमधील मंत्री महापुरुषांच्या अपमान करण्याचे काम हे राज्यातील भाजपा-शिंदेगट सरकार करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून काल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनात बोलू नयेत शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी,नोकरदारवर्ग महिला,मजुरांचे व सामान्य जनतेचे प्रश्न मांडू नयेत.तथा बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने त्यांना सत्ताधाऱ्यांच्या आग्रहाखातर निलंबन करण्यात आले. त्यांचा निषेध म्हणून जळगांव जिल्हा,भुसावळ तालुका व शहराच्यावतीने तहसील कार्यालयात तहसीलदार . दीपक धिवरे यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष .राजेंद्र चौधरी,जिल्हा सरचिटणीस सौ.संगीता भामरे,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ सारिका पाटील,महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष सौ.रेखाताई जाधव,भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, लीगल सेल तालुकाध्यक्ष ॲड.गौतम साळुंखे, ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ तालुकाध्यक्ष तुकाराम बाविस्कर,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार,गटनेता तथा नगरसेवक उल्हास पगारे,नगरसेवक दुर्गेश ठाकूर,विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पवार, उपसभापती अशोक पाटील,जिल्हा अल्पसंख्यांक चिटणीस मुन्ना सोनवणे,शहर सरचिटणीस राजू भोई, एस.आर. पाटील सर,संतोष गुप्ता,विनायक शिवरामे,संदीप सपकाळे,विशाल ठोके,गोकुळ राजपूत,मनोज ठोकळकर,शहराचे युवक संघटक सचिन पाटील,पवन जाधव आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.



