भुसावळ । प्रतिनिधी
मराठीतील लेखनदोष दूर करण्यासाठी नियुक्त तज्ञ समितीच्या शिफारशी स्विकारून राज्य शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी पारंपारीक व जोडाक्षरे पद्धती पुन्हा सुरु करण्यासाठी आदेश काढला होता . हा निर्णय शासकीय, निमशासकीय , शैक्षणिक संस्था व पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळ या सर्वांसाठी बंधनकारक होता . मात्र, शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मीती मंडळ व संशोधन मंडळ पुणे यांनी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत पुर्वीप्रमाणेच तोडक्षर पद्धत सुरु ठेवली आहे .
पाठ्य पुस्तक मंडळाला शासनाच्या या आदेशावर काही आक्षेप असला तरी शासन जोपर्यंत नविन आदेश देत नाही तोपर्यंत विद्यमान आदेशच पाळणे बंधनकारक आहे . मात्र, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अशा बाबी लक्षात येत नाहीत का? आपले आक्षेप नोंदवुन पालकांना त्याची जाणीव करून देणे आवश्यक वाटत नाही का ? विद्यार्थी वृत्तपत्रांत ” ल” व ” द्वि” असा लिहलेला पाहतात . मात्र, तो शाळेत चुकीचा ठरत असल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक व बौध्दीक गोंधळाला जवाबदार कोण ? यामुळे शासनाच्या आदेशाची पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळच का? उपेक्षा करीत आहे . असा प्रश्न प्र . ह . दलाल यांनी उपस्थित केला आहे .



