भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढत असून स्वच्छतेच्या मोबदल्यात नागरिकांकडून कर वसूल करूनही कचरा संकलनाकरीता सुरु करण्यात आलेल्या घंटा गाड्या बंद केल्या आहेत या बंद असलेल्या घंटागाड्या मात्र आजही पालिकेच्या आवारात धुळखात पडलेल्या आहेत त्या त्वरित सुरु करण्यात येवून नागरिकांच्या उपयोगात आणून सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील शिवसेनेचे शहर संघटक योगेश जगन्नाथ बागुल यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचेकडे केली असून याबाबतीत मंगळवार 4 रोजी निवेदन दिले आहे .
स्वच्छता समितीने केलेल्या सर्व्हेक्षणात भुसावळ शहराची काही महिन्यांपूर्वी अस्वच्छतेच्या बाबतीत नोंद झाली होती त्यानंतर पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत घंटागाड्या खरेदी केल्या व पाठपुरावा करीत जेमतेम गेलेले नावलौकीक मिळवले . आणि पुन्हा स्वच्छते कडे दुर्लक्ष केले .एवढेच नव्हे तर पालिकेने नोंद असलेल्या प्रत्येक मिळकत धारकांकड़ून स्वच्छतेच्या नावाखाली प्रत्येकी वर्षाला 350/-रुपये व व्यावसायीकां कडून प्रत्येकी 580 /- रुपये प्रमाणे कर आकरणी करण्यास सुरवात केली. परंतु आजही अच्छतेच्या बाबतीत या शहराची अवस्था जैसे थे अशीच आहे. पालिकेच्या ताब्यात असलेल्या जवळपास 10 घंटागाड्या पालिकेच्या आवारात आजही धुळ खात पडलेल्या आहेत. त्याचा उपयोग करण्यात यावा.नाहीतर पालिका पुन्हा नविन गाडया खरेदी करणार व यामुळे पालिकेच्या खर्चात अधिक भर पडूंन याचाही नाहक भूर्दड पालिकेला सहन करावा लागेल . स्वच्छतेच्या नावाखाली जनतेकड़ून घेतलेल्या कराच्या मोबदल्यात त्यांना सुविधा द्याव्या असे निवेदनात नमूद असून गाड्या त्वरित सुरु न झाल्यास ‘शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे



