विवाहितेच्या विद्यमान कथित पतीची पुर्वाश्रमीच्या पतीला मारहाण –

जळगाव : पती पत्नीचे नाते वकीलाच्या मदतीने फारकत घेतल्यानंतर संपुष्टात आले. त्यानंतर ती विवाहीता त्याच गावातील दुस-या तरुणासोबत राहण्यास गेली. गेल्या चार महिन्यापासून ती विवाहीता दुस-या तरुणासोबत राहू लागली. दरम्यान त्या विवाहीतेचा पहिला पती मोटार सायकलने जळगावला येत असतांना त्याची वाट तिच्या दुस-या कथित पतीने अडवली. तुझ्या पहिल्या पत्नीसोबत माझे चांगले सुरु आहे. आता तु आमचे संबंध का बिघडवतो असे म्हणत दुस-याने पहिल्याला मारहाण सुरु केली.

तुझ्यासोबत राहणा-या माझ्या पत्नीचा आता काहीही संबंध राहिलेला नाही असे समजावत असतांना दुस-या कथित पतीने हातातील लोखंडी आसारीने महिलेच्या पहिल्या पतीच्या डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली. त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी देखील लोखंडी पाईपाने त्याला मारहाण केली. दरम्यान रस्त्याने जाणा-या काही लोकांनी जखमीला सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार आटोपल्यानंतर जखमीने त्याच्या पुर्वाश्रमी पत्नीच्या विद्यमान कथित पतीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
[02/06, 12:45 PM] Ujjwala: करोनानंतर पुन्हा माणुसकीचे दर्शन : अपर रेल्वे प्रबंधक यांच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून बडतर्फ ट्रकमनला मिळाली पुन्हा नोकरी :
भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागाचे अपर रेल्वे प्रबंधक यांनी मानवतेच्या दृष्टीकोणातून हाताला काम नसल्याने वैफल्यग्रस्त होवून आत्महत्या वा भूकबळीचे शिकार होऊ नये म्हूणन ट्रकमनला पुन्हा कामावर घेतले आहे.वृद्ध आई वडील व परिवाराचा सांभाळ करण्यासाठी कामावरुन बडतर्फ केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यास रुजू होवून कामाची पुन्हा एक नामी संधी देवून मानुसकीचे दर्शन भुसावळ येथील अप्पर रेल्वे प्रबंधक रुकमैय्या यांनी केलेल्या कौतुकास्पद कार्यातून दिसून येत आहे .
त्यांच्या या निर्णायक भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
कामावर सतत गैरहजर राहणारे ट्रकमन कर्मचारी यांना कामवरून कमी करण्यात आले होते. आजच्या परिस्थिती मध्ये पुन्हा नोकरी न मिळणार नाही. प्रपंचसाठी लागणारी आर्थिक तरतूद आपण करू शकणार नाही. या विचाराने आपणास पुन्हा कामावर घेण्यात यावे या साठी भुसावळ येथील रेल्वेत ट्रकमन असलेला कर्मचारी यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे एडीआरएम मीणा रुकमैया यांना आपली व्यथा मांडण्यासाठी आपल्या वृद्धआई वडिल, पत्नी,लहान मुलाबाळासह भेट घेतली असता पुन्हा कामावर रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे.
“आजकल नोकरी कोणाला मिळत नाही आजची परिस्थिती बघता आर्थिक संकट समोर येत आहे. त्यामुळे परिवारावर उपासमारी व भूकबळी पर्यायाने आत्महत्याची वेळ येत आहे हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन भुसावळ विभागातील अश्या काही गरजु कर्मचाऱ्याना सुद्धा संधी देण्यात येईल जेणे करून त्यांचे वृद्ध आई वडिलांच्या संगोपनाकरीता परत कामावर घेण्यात येवून संधी देणार असल्याचं एडीआरएम मीना रुकमैया
सांगीतले आहे.