भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन, सक्षम सेवा फाउंडेशन,मानवतर बहुद्देशीय संस्था, सक्षम नारी फाउंडेशन, साईलीला व श्रीकृपा बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातील विविध सामाजिक संस्थाच्या वतीने आज दि.१७ तारखेला किराणा दुकान व मॉलमधून वाईन विक्री होणार , हा सरकारचा निर्णय योग्य की अयोग्य “यावर महिलांचे खुले चर्चासत्र संपन्न झाले . यावेळी उपस्थित सर्व महिलांनी एकमताने शासनाच्या या निर्णयास जोरदार विरोध दर्शविला असून विद्यार्थांसह व्यसनीं तरुणाई व बेरोजगार व्यसनाधीन पीढी घडविण्याचे हे षडयंत्र असल्याची दाट शक्यता दिसून येत असल्याचां सुर निघाला . चर्चासत्रा नंतर सेवाभावी संघटनेसह उपस्थित महिलांनीं याबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले .
पंचायत समिती हॉल येथे दु २.३० वाजता आयोजित या चर्चासत्रात यावेळी व्यासपीठावर सक्षम सेवा फाउंडेशन अध्यक्षा
डॉ सुवर्णा गाडेकर , मानवतर बहुद्देशीय संस्था अध्यक्ष डाॅ. मधू मानवतकर ,आर्या फाउंडेशन अध्यक्षा डाॅ. वंदना वाघचौरे , सक्षम नारी संघटना अध्यक्षा आरती चौधरी , प्रो. डाॅ भाग्यश्री भंगाळे , साईलीला व श्रीकृपा बचतगट अँड जास्वंदी भंडारी ,व्यसनमुक्तिचे चंद्रकांत चौधरीं उपस्थित होते .
भारतातच नव्हे तर संपुर्ण जगातील लोकांच्या मृत्यूची संख्या करोना पेक्षा जास्त अँक्सिडेंट, व कॅन्सर, हार्ट डिसीज, स्ट्रोक यांच्यामुळे झाले याचे मुख्य कारण अल्कहोल आहे. आणि आता जर वाईनची विक्री सरसकट किराणा दुकानात होत असेल तर अपघात होतीलच ओघाने चोरी , लूटमार यासह गुंडगिरी,गुन्हे व गुन्हेगारी वाढेल महिला अजुनच असुरक्षित होतील , व अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढणार असे डॉ गाढेकर यांनी सांगीतले. डाॅ. मधू मानवतकर यांनी मानवतेची प्रार्थना सादर केली. तर
डाॅ. वंदना वाघचौरे यांनी प्रास्ताविकात नवजिवन व्यसनमुक्ती केंद्रात गेल्या 10 वर्षापासून काम करताना लक्षात आले कि या पाच वर्षांत व्यसनाधीनतेचे प्रमाण 15 टक्के वरुन 25 टक्के झाले आहे त्यामुळे किराणा दुकानात वाईन विक्रीचा आदेश जर सरकारने मागे नाही घेतला तर भावी पिढी उध्वस्त होईल असे सांगीतले .
सक्षम नारी संघटनेच्या आरती चौधरी यांनी सांगितले की बहुतांशी जोडप्यांचे भांडणाचे कारण दारु आहे आणि शासनाच्या या निर्णयामुळे अजुन कौटुंबिक समस्या नक्कीच वाढतील.
प्रसंगी सुरु झालेल्या चर्चासत्रात एकूण १७ महिलांनी सहभाग घेतला. यात प्रो. डाॅ भाग्यश्री भंगाळे , डाॅ. सुषमा खानापूर, वर्षा लोखंडे, राजश्री बादशहा, भारती राठी, अँड. चित्रा आचार्य. सुवर्णा इंगळे, भारती म्हस्के, डाॅली टाक, सायमा एतेशाँ, भावना झा, पल्लवी मुळे, प्राची राणे, सुनीता जोशी ,अँड कल्पना टेमाणी, शिक्षिका अंजुम खान,यांचेसह महिलांनी आपले मत व्यक्त करीत या निर्णयाचा निषेध करून विरोध केला .
शेवटी कॉन्सिलर आरती चौधरी यांनी कार्यक्रमाचा सारांश सांगीतला व सर्व महिलांनी एकमताने याचा विरोध दर्शविला असे सांगितले
महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी चर्चासत्रात सहभागी होवून पाठींबा दिला व भुसावळच्या जागरूक महिलांचा आदर्श संपुर्ण महाराष्ट्रातील महीला निश्चिंत घेतील व सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करतील.असेही चंद्रकांत चौधरीं म्हणाले .
दरम्यान चर्चासत्रा नंतर
डॉ सुवर्णा गाडेकर , डाॅ. मधू मानवतकर ,डाॅ. वंदना वाघचौरे , आरती चौधरी ,अँड जास्वन्दी भंडारी यांचे नेतृत्वात सहभागी महिलांनी सुमारे चार ते पाच हजार स्वाक्ष-यांचे निवेदन प्रांताधिका-यांना सहभागी महिलांनी दिले.
चर्चा सत्रात महिलांनीं
भारती म्हस्के यांनी सांगितले की बहुतांशी रेप केसेस मध्ये किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस मध्ये मुख्य कारण दारू असते.
भावना झा यांनी सांगितले की लोकसंख्येच्या 50% प्रमाण महिला आहेत त्यामुळे त्यांचा आवाज सरकारला ऐकावाच लागेल
प्राची राणे यांनी सांगितले महाराष्ट्रात जेव्हा होईल तेव्हा पण जळगाव जिल्हात आम्ही व्यसनमुक्ती करूच.
पल्लवी मूळे यांनी सांगितले की आई ही मुलांना साफ्ट ड्रींक सुध्दा देत नाही मात्र या निर्णया मुळे उद्या किराणा आणायला मुल गेल्यावर वाईन साठी सुद्धा हट्ट करतील नाही म्हटल्यावर स्वतः जाऊन घेतील यावेळी आईने काय करावे?.
कार्यक्रमांचे सूत्रसंचलन डॉ सुवर्णा गाढेकर यांनी केले तर आभार अँड जास्वन्दी भंडारी यांनी मानले .



