पवार साहेबांच्या कार्याची महती घराघरापर्यंत पोहोचवा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे आवाहन : भुसावळला शरद युवा संवाद यात्रेचे आगमन :

भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेसाठी नानाविध कार्य केले आहे. हे कार्य माहित नसणारे अनेक युवक राष्ट्रवादीवर चिखलफेक करताना दिसून येतात. यामागे विरोधकांचा प्रबळ हात आहे. मात्र अशावेळी पवार साहेबांनी केलेल्या कार्याची महती आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या नात्याने घराघरापर्यंत पोहोचवली तर पवार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा खऱ्या अर्थाने गौरव होणार आहे. शरदचंद्रजी पवार यांचे जळगाव जिल्ह्यावर प्रेम असल्याने ही शरद युवा संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यातून सुरू केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांनी भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमात केले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित शरद युवा संवाद यात्रा भुसावळ येथे आली असता मेहबूबभाई शेख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्रभैय्यासाहेब पाटील होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनी शरद युवा संवाद यात्रेविषयी माहिती देऊन युवकांना जोडण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले. यात्रेला आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन आदरणीय पवार साहेबांचे कर्तृत्व जनसामान्यांपर्यंत न्यावे, असे देखील आवाहन केले. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले वातावरण असून जास्तीत जास्त पदाधिकारी निवडून येण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी तनमनधनाने झटावे, असे आवाहन देखील रविंद्र नाना पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऐडव्होकेट रवींद्रभैय्या पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जळगाव जिल्ह्यात आठ आमदार निवडून दिल्याचे सांगितले. शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगाव जिल्ह्यातील जनता नेहमीच राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या की, शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाथाभाऊ आणि आम्ही राष्ट्रवादीत आलो आहे. पवार साहेबांचे कार्य आणि कर्तृत्व याहीपुढे अधिक जोमाने सुरू होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मेहबूबभाई शेख आपल्या मनोगतात म्हणाले की, जुने नवे यांना सोबत घेऊन काम करावे. पक्षात राहून एकमेकांचे उणेदुणे काढत बसू नये. एकमेकांचे पाय न खेचता एकमेकांच्या प्रगतीसाठी तत्पर रहावे. जेणेकरून आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्कृष्टतेसाठी काम करत राहू. काम करताना अडचणी येतात. मात्र त्या दूर करून आपण सामोपचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम पुढे न्यावे आणि शरद पवार साहेब यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपण सर्वजण कार्य करावे, असे आवाहन देखील मेहबूब भाई शेख यांनी केले. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.
त्यावेळी प्रदेश चिटणीस एजाज भाई मलीक,माजी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा सुनिल नेवे सर, योगेश देसले,युवक प्रदेश सरचिटणीस ललित बागुल,अरुण आसबे,निशांत वाघमारे, प्रशांत सपकाळ, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी,तालुका अध्यक्ष दिपक मराठे, नाना पवार, शेतकी संघ चेरमन पंढरीनाथ पाटील, प्रदेश सदस्य शकील पटेल,रईस खान लोधी,सरजू तायडे,अतुल चव्हाण, माजी नगर सेवक बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, विजय अवसर्मल, प्रतिभा तावडे, अश्विनी रविंद्र पाटील, अनिस लोधी, सोहेल खान, राहुल वाघ, सचिन पाटील, आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रमोद नाना पाटील यांनी आभार मानले.