भुसावळ : ओबीसींची जातनिहाय जनगणना करावा व शेतकर्यांसाठी तीन काळे कायदे रद्द या प्रमुख मागणीसाठी बामसेफ संघटनेतर्फे शुक्रवार, 12 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भुसावळ तालुक्यातील बामसेफच्या सर्व सहयोगी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत होणार्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या धरणे आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी मोर्चा खान्देश प्रभारी सुधाकर बडगुजर व राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष राजू जाधव व कार्यक्रमाचे संयोजक हारुण मन्सुरी यांनी केले आहे.



