भुसावळ (प्रतिनिधी )-

वरणगाव येथील पालिकेच्या अस्थायी कर्मचाऱ्याचे मागील सहा ते सात महिण्याचे किमान वेतन थकल्याने व तीन महिण्याचे विशेष भत्ताची कपात केल्याने संतप्त पाणी पुरवठा विभागाच्या आठ ते दहा कर्मचाऱ्यानी अंगावर पेट्रोल , डिझल आंगावर ओतून मुख्यधिकाऱ्या समोरच नगर परिषदेच्या आवारात आत्मदहणाचा प्रयत्न केला पाच तासाच्या या घडामोडी नतंर संघटनेचे नेते व माजी नगर सेवकाच्या मध्यस्थीने मुख्यधिकारी यांनी दहा दिवसानी वेतन अदा करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्या नतंर कर्मचारी शांत झाले.
नगर परिषद कर्मचाऱ्याना वेतना साठी वारंवार झगडाव ईलागत आहे ऐन सणा सुदीच्या दिवसावर ही आपल्या वेतना साठी विविध प्रकारचे आदोलन करूण आपले हक्काचे वेतन मिळवावे लागते त्यात थोड्या प्रमाणात का होईणा वेतन मिळाल्या नंतर त्यावर समाधान माणुन उदारनिर्वाह चालविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या शुक्रवार रोजी नगर परिषदेत चांगलाच संताप दिसुन आला ऐन I दिवाळी सणाच्या वेळी किमान वेतन व विशेष भत्ता अनुदान मिळविण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्याना काम बंद आदोलन करावे लागले होते त्यावेळी मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी किमान वेतन न देता विशेष भत्ता अनुदान दिले जाणार असल्याचे लेखी अश्वासन दिल्याने आदोलनाला स्थगिती दिली होती मात्र त्यावेळी तीन फक्त महिन्याचे विशेष भत्ता देण्यात आले होते त्यानंतर किमान वेतन दिले नसल्याने आजपर्यत कर्मचाऱ्याचे सात महिन्याचे किमान वेतन रखडल्याने नगर परिषदेने कर्मचाऱ्याचे तीन महिन्याचे किमान वेतन कर्मचाऱ्याच्या नावे जमा केले मात्र मागील आदोलना वेळी देण्यात आलेले विशेष भत्याचे तीन महिन्याची रक्कम कपात केली गेली व काही कर्मचाऱ्याच्या नावे कमी जास्त रक्कम खात्यात जामा झाल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्याचा संताप झाला याचा जाब मुख्याधिकारी यांना विचारण्यासाठी गेल्या नंतर मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी कर्मचाऱ्यास सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने पाणी पुरवठा विभागाच्या आठ ते दहा कर्मचाऱ्यानी नगर परिषद आवारातच पेट्रोल , डिझल आंगावर ओतून आत्मदहणाचा प्रयत्न केला वेळीस सुनिल काळे, राजेंद्र चौधरी , सुधाकर जावळे, रविंद्र सोनवणे , अरुणाबाई इंगळे, वैशाली देशमुख , संभाजी देशमुख ,शे सईद शे भिकारी, समाधान चौधरी व अंनत गडे यांनी हस्तक्षेप करुण पुढील अनर्थ टाळला
कुंटुबीयांचा आक्रोश
या घटनेची माहीती कर्मचाऱ्याच्या कुंटूबीया पर्यत पोहचताच कुंटुबातील लहान मोठया प्रत्येक सदस्यानी नगर परिषद कार्यालया कडे धाव घेत एकच आक्रोश करीत वेतन मिळत नसल्याने कुंटुबाचा उदारनिर्वाह कसा करायाचा असा सवाल मुख्याधिकाऱ्याला त्यांनी केली
चार ते पाच तास गोधळाचे
वेतन मागणीसाठी आत्मदहण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याना माजी नगरसेवकानी समजुत काढल्या नंतर वेतनाच्या मागणीवर जो पर्यत ठोस लेखी प्रशासनाळून अश्वासन मिळत नाही तो पर्यत आम्ही इथेच बसु अशी ठाम भुमीका घेतल्या नंतर चार ते पाच तास नगर परिषदेच्या आवारात गोंधळाचे वातावरण होते
लेखी अश्वासनानतंर कर्मचारी कामावर रुजु
आपल्या हक्काचे वेतन गेल्या तीन महिन्या पासुन मागणी करीत असल्यानंतरही नगर परिषद प्रशासनाला जाग येत नसल्याने कर्मचाऱ्यानी हा पावित्रा उचला भारतीय मजदूर संघटनेचे अनंत गडे व कामगार संघटनेचे सुनिल पवार हे या ठिकाणी उपस्थीत होऊन जो पर्यत लेखी आश्वासन नाही तर काम नाही अशी भुमीका घेऊन परिषदेच्या आवारातच ठिय्या करून मुख्यधिकारी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या नंतर मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी येत्या दहा दिवसात वेतन देण्याचे लेखी अश्वासना नंतर कर्मचारी कामावर रुजु झाले .
नवीन मुख्याधिकाऱ्या समोर आवाहन
लेखी अश्वासना नंतर थोड्याच वेळाने मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी वरणगाव नगर परिषदेचा पदभार सोडला असून जळगाव येथे रूजु होण्या साठी रवाना झाले तर त्यांच्या जागी सावदा येथील सौरव जोशी यांची नियुक्ती झाल्याने आता त्यांच्या समोर कर्मचाऱ्याचे वेतनाचे मोठे आवाहन आहे . त्यातच न.प.चे वार्षिक उत्पन्न एक कोटी बावीस लाखाचे आसपास असुन पगारावर मात्र दोन कोटी सत्तर लाख रुपयांची आवश्यकता भासते . हि सुद्धा एक तारेवरची कसरतच आहे .


