भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागा च्या नियम 4.5 च्या निर्देशानुसार ज्या विद्यार्थी नी दहावी व बारावी महाराष्ट्र तुन उत्तीर्ण झाले असतील तेच विद्यार्थी राज्य कोटा मधून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशास पात्र असतील असा निकष आहे.
परंतु महाराष्ट्र शासनाने 20/04/19 च्या शासन निर्देशानुसार ज्या विद्यार्थ्यांनी 2017 पर्यंत दहावी महाराष्ट्र राज्य च्या बाहेर उत्तीर्ण केली असेल ते सुद्धा राज्य कोटा मधून प्रवेश घेण्यास पात्र आहेत अशी सूट दिली होती.
मेघावी विनोंद बियाणी यांनी 2018 ला दहावी ही खरगोन मध्यप्रदेश मधुन उत्तीर्ण केली आणी बारावी महाराष्ट्र मधून उत्तीर्ण केली. नीट च्या परीक्षेत 97.789 % टक्के मार्क मिळाले परंतु त्या राज्य कोटा मधून प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरत नव्हते म्हणून त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे 2019 च्या शासन निर्देशाचे फायदे हे 2018 ला महाराष्ट्र बाहेर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी ना व्हावा म्हणून विनंती केली . उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही म्हणून त्यांनी सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली. मा. सर्वाच्च न्यायालयाने दिनांक 01/12/2020 च्या आदेशाने मेघावी बियाणी यांना राज्य कोटा मधून प्रवेश देण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाला दिला . मेघावी बियाणी यांच्या तर्फे सर्वोच्च न्यायालयात ऍड सुधान्शु चौधरी व ऍड निर्मल दायमा यांनी काम बघितले



