भुसावळ (प्रतिनिधी )- मा. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ येथील ट्रामा सेंटर (शासकीय रुग्णालय) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर व तालुका शाखेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गोरगरीब व गरजू रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष गणेश चौधरी (सोनवणे) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून रुग्णांप्रती सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा आनंद सेवाभावी उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करताना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख गणेश चौधरी , तालुका संघटक अनिल महाजन , दीपक सूर्यवंशी. जोहरे काका , सुनील गायकवाड. उपशहर प्रमुख राकेश खरारे. अरुण साळुंखे, राजूभाऊ इंगळे. रोहिदास चव्हाण व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक कार्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कौतुक केले.


