महाराष्ट्र हादरला : पिकअप वाहन विहिरीत कोसळले, १४ भाविकांचा मृत्यू

 संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
       

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन गावाकडे परतत होते. यावेळी तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर विहीर पाण्याने पूर्ण भरलेली होती. तसेच विहिरीभोवती कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने वाहन थेट पाण्यात गेल्याचे सांगितले जात आहे.या भीषण दुर्घटनेत १४ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि चार लहान मुलांचा समावेश असून दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती प्रशासना कडून देण्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली...घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.