बियाणी स्कूलच्या यशाची परंपरा कायम;१० वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश.


भुसावळ (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी व मराठी माध्यम) मधील विद्यार्थ्यांनी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.

इंग्रजी माध्यमाचे चमकते तारे:

इंग्रजी माध्यमात नाथजोगी लोचना संदीप हिने ९७.२०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर सोनवणे तेजश्री उमेश हिने ९२.२०% गुणांसह द्वितीय, तर खत्री दीपेश विजय याने ८९.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.

मराठी माध्यमाची दमदार कामगिरी:
मराठी माध्यमातही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली असून, झोपे भूषण वासुदेव ८६.२०% गुणांसह प्रथम आला आहे. चौधऱी ललित नामदेव (८४.४०%) याने द्वितीय,तर पाटील तन्मय प्रल्हाद (८३.८०%) याने तृतीय क्रमांक मिळवला.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सेक्रेटरी डॉ. संगीता बियाणी,एक्झिकेटिव्ह डायरेक्टर रोनक बियाणी,पियुष बियाणी,डॉ.आयुषी बियाणी आणि प्राचार्य रुद्रसेन गंठिया यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक आणि शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे