भुसावळ(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा एकूण निकाल ८२.५०. टक्के लागला आहे.या परीक्षेत सरोज सतीश जाधव हिने ८२ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दिपाली विकास पारधे आणि पूर्व अमित परदेशी या दोघांनी प्रत्येकी ७९ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.तसेच वैष्णवी राकेश जाधव हिने ७०.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य के.बी.सक्सेना आणि पर्यवेक्षक एम.आर. शहा यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.तसेच हिंदी सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



